AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मित्राला सिगारेट देण्यास नकार दिला अन् त्याने… नाशिकच्या पंचवटीत नेमकं काय घडलं?

नाशिकच्या पेठरोड भागात सिगारेट न दिल्याच्या वादातून २७ वर्षीय राहुल राऊतची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संशयित सराईत गुन्हेगार रोहिदास आहेरविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

मित्राला सिगारेट देण्यास नकार दिला अन् त्याने... नाशिकच्या पंचवटीत नेमकं काय घडलं?
crime
| Updated on: Apr 22, 2026 | 10:11 AM
Share

राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांचे सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. नाशिकच्या पंचवटीतील पेठरोड परिसरात एक मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ सिगारेट देण्यास नकार दिला म्हणून एका २७ वर्षीय तरुणावर चॉपरने हल्ला करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत राहुल कृष्णा राऊत (२७) हा शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत नवनाथ नगरमधील साईबाबा मंदिराजवळ गप्पा मारत बसला होता. याच वेळी संशयित आरोपी रोहिदास वामनराव आहेर (२६) तिथे आला. त्याने राहुलकडे सिगारेटची मागणी केली. मात्र, राहुलने सिगारेट देण्यास नकार दिला. यावरुन त्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापलेल्या रोहिदासने स्वतःजवळील चॉपर काढला. त्यानंतर त्याच्या उलट्या बाजूने राहुलच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जोरदार प्रहार केले. या जीवघेण्या हल्ल्यात राहुल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

उपचारादरम्यान मृत्यू

यानंतर गंभीर जखमी झालेल्या राहुलला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती खालावत गेली. यानंतर सोमवारी २० एप्रिलला रात्री दोनच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मयताचे वडील कृष्णा हरी राऊत यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी रोहिदास आहेर विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.

आरोपी सराईत गुन्हेगार

हल्ला करणारा रोहिदास आहेर हा पोलिसांच्या दप्तरी सराईत गुन्हेगार म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर यापूर्वीही पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, तसेच म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडी, मारामारी आणि दहशत निर्माण केल्याचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पवार या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, फरार आरोपीच्या अटकेसाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. सद्यस्थितीत या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...