शेतकऱ्याच्या गोडव्याचा झाला कोळसा, डोळ्या देखत होत्याचं नव्हतं झालं…

5 ते 6 शेतकऱ्यांचा तब्बल 10 ते 12 एकर ऊस जळून खाक झाला आहे. असून पिंपळगाव येथील अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझवण्यात आली आहे.

शेतकऱ्याच्या गोडव्याचा झाला कोळसा, डोळ्या देखत होत्याचं नव्हतं झालं...
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Oct 28, 2022 | 1:59 PM

नाशिक : महावितरणाच्या विद्युत लाईनच्या स्पार्किंगमुळे आगीच्या घटना काही केल्या थांबायला तयार नाही. आणि याचा वारंवार फटका हा शेतकऱ्यांना बसतोय. नाशिकमध्ये महावितरणाच्या विद्युत लाईनच्या स्पार्किंगमुळे ऊसाच्या शेतीचे आणि द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऊस शेती तर अक्षरशः जळून खाक झाली आहे. जवळपास चार ते पाच शेतकऱ्यांचे यामध्ये लाखों रुपयांचे नुकसान झाले असून भरपाईची मागणी केली जात आहे. महावितरणच्या तारांच्या अनेकदा स्पार्किंगमुळे शेतीचे अनेक ठिकाण नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तशीच घटना नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात घडली असून शेतकरी वर्गात महावितरण बद्दल नाराजी पसरली आहे. दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे दहा ते बारा एकर ऊसाला आग लागल्याची घटना घडली आहे. याशिवाय बाजूला असलेल्या द्राक्ष बागेचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, उसाच्या शेतावरून महावितरणाची मेन विद्युत लाईन गेलेली असून विद्युत लाईनच्या स्पार्किंग मुळे ही आगीची घटना घडली असावी अशी शक्यता आहे.

यामध्ये 3 ते 6 शेतकऱ्यांचा तब्बल 10 ते 12 एकर ऊस जळून खाक झाला आहे. असून पिंपळगाव येथील अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझवण्यात आली आहे.

महावितरणाच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाला असावा अशी माहिती समोर येत असून भरपाईची मागणी केली जात आहे.

मोतीराम पाटील, रंगनाथ पाटील, विष्णू मोरे, कैलास पाटील आणि सदाशिव पाटील या शेतकऱ्यांचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहेत.

ऊसाच्या शेती बरोबरच खंडेराव फुकट यांच्या द्राक्ष बागेचेही नुकसान झाले असून त्यामध्ये ड्रिप इरिगेशनचे आणि द्राक्षाच्या झाडांचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत त्वरित पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना याबाबत तात्काळ भरपाई करून द्यावी अशी मगणी कादवा साखर कारखान्याचे माजी चेअरमन प्रभाकर पाटील यांनी केली आहे.