AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik IT Company Scandal : सणांना आम्ही साडी नेसून यायचो, तेव्हा आमच्याकडे पाहून ते… नाशिक TCS मधला अजून एक प्रकार उघड

नाशिकच्या कंपनीतील कॉर्पोरेट एथिक्स आणि कार्यस्थळ संस्कृतीला धक्का देणारा प्रकार समोर आला आहे. कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचार, धर्मांतरणाचे प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचे गंभीर आरोप आहेत. एका माजी कर्मचाऱ्याने या षडयंत्राचे सविस्तर खुलासे केले आहेत, ज्यामुळे कंपनीच्या अंतर्गत सुरक्षा नियमावलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही घटना व्यावसायिक जगात कार्यरत असलेल्या एका मोठ्या समस्येकडे लक्ष वेधते.

Nashik IT Company Scandal : सणांना आम्ही साडी नेसून यायचो, तेव्हा आमच्याकडे पाहून ते... नाशिक TCS मधला अजून एक प्रकार उघड
नाशिकच्या कंपनीत कर्मचाऱ्यांचा असा व्हायचा छळ
| Updated on: Apr 17, 2026 | 12:47 PM
Share

देशातील प्रतिष्ठित आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मधील ‘कॉर्पोरेट एथिक्स’ आणि ‘वर्कप्लेस कल्चर’यांची धूळधाण उडवणारा एक भयानक प्रकार सध्या समोर आला आहे. या कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी कंपनीतील तरूणी व महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच त्यांच्या धर्मांतरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप असून गेल्या आठवड्याभरापासून हे प्रकरण चांगलंच पेटलेलं आहे. याप्रकरणात रोज नवनवी धक्कादायकत माहिती समोर येत असून आता कंपनीच्या माजी कर्मचारी तरूणीच आणखी हारवणारे खुलासे केले आहेत. टीसीएसच्या एका माजी कर्मचाऱ्याने, कंपनीमधील रूपांतरण सिंडिकेट आणि लैंगिक छळाच्या साखळीचे खरे स्वरूप उघड केले आहे. या महत्त्वपूर्ण खुलाशाने केवळ कंपनीच्या अंतर्गत सुरक्षा नियमावलीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं नाही तर व्यावसायिक जगात कार्यरत असलेल्या एका मोठ्या षडयंत्राकडेही संकेत दिले आहेत.

अश्लील भाषेचा वापर

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कर्मचाऱ्याने थेट आरोप केले. सर्व आरोपी, विशेषतः त्यांची संवाद साधण्याची पद्धत, अतिशय असभ्य होती. मुलींना टीएल डेस्कवर बोलावण्यात यायचं आणि त्यांच्याशी अत्यंत अश्लील भाषेत बोललं जायचं, अशी भाषा वापरली जायची, ज्याचा कोणत्याही व्यावसायिक किंवा व्यापारी कार्यालयात वापर होत असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही’ असं माजी कर्मचाऱ्याने सांगितलं.  पुढे बोलताना,  धार्मिक भावना दुखावल्याचे आणि “सांस्कृतिक बदनामी” केल्याचे गंभीर आरोपही त्या कर्मचाऱ्याने केले.

‘ मुख्य आरोपी तौसीफ अत्तारने जाणीवपूर्वक हिंदू धर्माला लक्ष्य केलं. सणासुदीच्या काळात, जेव्हा महिला कर्मचारी पारंपरिक भारतीय संस्कृतीनुसार साडी नेसून किंवा टिकली लावून येत, तेव्हा तौसीफ सर्वांसमोर त्यांची थट्टा करत असे’ असा आरोपही त्या माजी कर्मचाऱ्याने केला आहे.

धार्मिक चालीरीतींची केली जायची थट्टा

या प्रकणातील मुख्य आरोपी रोपी तौसीफ अत्तारवर हिंदू धार्मिक चालीरीतींना लक्ष्य केल्याचा आरोप आहे. सणासुदीच्या काळात साडी किंवा टिकली घालणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची तो वारंवार खिल्ली उडवायचा असं एका महिला कर्मचाऱ्याने सांगितलं. ‘ प्रत्येक सणाला, जेव्हा आम्ही साड्या नेसून जाययचो, तेव्हा तो आमच्या पोशाखावर बोलायचा आणि धर्माबद्दल प्रश्न उपस्थित करायचा. आम्ही तिथून निघून जायाच प्रयत्न केल्यावर, तो अशा काही कमेंट्स करायचा की ते ऐकून आश्चर्य वाटायचं की एक टीम लीडर दुसऱ्या धर्माची इतकी चेष्टा कशी करू शकतो?, असंही ती म्हणाली.

या केसमध्ये सातत्याने नाव येणारी, फरार असलेली निदा खान हिच्याबद्दलही त्या माजी कर्मचाऱ्याने मोठा दावा केला. निदा खान ही एच आर नव्हती तर ती बदल्या आणि विभाग बदलांची व्यवस्था करणारा एक प्रोसेस असोसिएट होती असं त्याने सांगितलं. सुरक्षेच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना त्यांचे फोन, बॅग आणि जेवणाचे डबेसुद्धा ऑफिसच्या आवाराबाहेर ठेवण्यास सांगितलं जायचं, जेणेकरून ऑफिसमधील संभाषणं रेकॉर्ड होऊ नयेत असा दावाही त्या कर्मचाऱ्याने केला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...