AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Crime : निदा खानच्या त्या कारनाम्याने अख्खा महाराष्ट्र हादरला, आयटी कंपनीतील ती महिला कोण?

नाशिकमधील एका आयटी कंपनीतील लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणात नवनवे अपडेट्स समोर येत आहेत. या प्रकरणाच्या तपासाच्या केंद्रस्थानी सातत्याने आलेलं एक नाव म्हणजे HR एक्झिक्युटिव्ह निदा खान. पहिल्या एफआयआरमध्ये आरोपी म्हणून तिचे नाव आल्यापासून ती फरार आहे. एसआयटीकडून तिचा कसून शोध घेतला जातोय. या भयाक कांडामध्ये तिची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Nashik Crime : निदा खानच्या त्या कारनाम्याने अख्खा महाराष्ट्र हादरला, आयटी कंपनीतील ती महिला कोण?
नाशिक कंपनी लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरण
| Updated on: Apr 15, 2026 | 10:09 AM
Share

नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत महिलांचा लैंगिक छळ आणि त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याच्या प्रकरणाने प्रचड खळबळ उडाली. गेल्या आठवड्याती ही केस उघडकीस आली आणि अख्खं राज्य हादरलं. या कंपनीत छळ होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर काही महिला पोलिस अधिकारी वेष बदलून तिथे गेल्या होत्या, आणि आरोपींचे गैरवर्तन, अश्लील वागणं समोरासमोर दिसल्यावर त्यांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. या केसमध्ये आत्तापर्यतं अनेकांना अटक करण्यात आली असली तरी याप्रकरणात प्रमुख सहभाग असलेली आणि कंपनीची HR एक्झिक्युटिव्ह निदा खान ही मात्र अद्याप सापडलेली नाही. FIRमध्ये नाव समोर आल्यापासूनच ती फरार आहे. एसआयटी तपासात तिच्या भूमिकेबद्दल गंभीर आरोप समोर आले आहेत. कंपनीतील पीडितांवर दबाव टाकणे, धर्मांतरासाठी सक्ती करणे आणि आरोपींच्या नेटवर्कला पाठिंबा देणे या आरोपांचा त्यात समावेश आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निदा खान ही केवळ एक कर्मचारीच नव्हती, तर कर्मचाऱ्यांना लक्ष्य करणाऱ्या आरोपी गटाची एक सक्रिय सदस्य होती. पोलिसांचा दावा आहे की, तिने केवळ आरोपी टीम लीडर्स पाठिंबाच दिला नाही, तर अनेक प्रकरणांमध्ये त्यांच्या कारवाया पुढे नेण्यातही तिने सक्रीय भूमिका बजावली.

पीडितांवर टाकला दबाव

आरोपांनुसार, निदा खान ही पीडितांच्या संपर्कात होती आणि इस्लामी चालीरीतींचे पालन करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकत होती. अनेक पीडितांचा आरोप आहे की, निदा खान हिने त्यांना, नमाजासाठी, तसेच विशिष्ट कपडे घालण्यास आणि धार्मिक प्रथा अवलंबण्यासाठी भाग पाडलं.

एवढंच नव्हे तर पोलिसांच्या तपासात तिचे आणखीही काळे कारनामे उघडकीस आले आहेत. पीडित महिलांचा छळ होत असताना तिने आरोपी पुरुषांना पाठिंबा दिला. आरोपी टीम लीडर्स तिला ‘डेअरडेव्हिलल’ म्हणत, तर पीडिता महिला, तरूणी तिला प्रचंड घाबरायच्या. निदा खान हिने, पीडितांचा अपमान केल्याचा आणि त्यांच्यावर मानसिक दबाव आणल्याचाही आरोप आहे.

WhatsApp ग्रुपवर ठरवायचे टार्गेट

पोलिसांच्या सांगण्यानुसार, एआर निदा खान ही आरोपींच्या या नेटवर्कमधील प्रमुख दुव्यांपैकी एक होती. तपासात असंही उघड झाले की, निदा खान एका अशा WhatsApp ग्रुपची सदस्य होती, ज्या ग्रुपमध्ये आरोपी एकमेकांशी संवाद साधत असत. या ग्रुपमध्ये कर्मचाऱ्यांबदद्दल चर्चा व्हायची, कोणाला कसं प्रभावित करायचं, पुढचं टार्गेट कोण असेल हे यावर ठरवलं जायचं. त्याच निदा खानचाही सक्रीय सहभाग होता.

मानसिक छळ, शिव्या आणि धर्मांतरासाठी दबाव

मात्र आता या WhatsApp ग्रुपमधील अनेक चॅट्स डिलीट करण्यात आले आहेत, पण ते पुन्हा मिळवण्याचा फॉरेन्सिक टीम प्रयत्न करत आहे. या केसमध्ये आत्तापर्यंत 12 पीडित समोर आल्या असून त्यांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आरोपींनी आपला छळ केला, ते शिव्या द्यायचे, त्यांना अयोग्यरित्या स्पर्श करायचे आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखावायचे, असं अनेक पीडितांनी सांगितलंय.

एवढंच नव्हे तर त्या पीडितांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जायचा. या संपूर्ण प्रकरणात निदा खानाही सहभाग होता, ती भरती प्रक्रियेद्वारे विशिष्ट पद्धतीने लोकांची भरती करत होती का, याचीही तपासणी केली जात आहे. पोलिसांनी तिच्या कारवायांसंबंधीच्या नोंदी मिळवण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापनाला पत्र लिहिलं आहे.

एका स्थानिक व्यक्तीच्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी कंपनीच्या आवारात गुप्तपणे महिला कॉन्स्टेबल तैनात केल्यावर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. हाऊसकीपिंग कर्मचारी असल्याचे भासवून, त्यांनी आतील हालचालींवर लक्ष ठेवले आणि तपासाला दिशा देणारी महत्त्वपूर्ण माहिती गोळा केली. तपासादरम्यान इम्रान नावाचा एक संशयितही समोर आला आहे, ज्याला आरोपींपैकी एकाने मलेशियातील आपला संपर्क म्हणून ओळखलं आहे. WhatsApp चॅट्सच्या आधारे त्याच्या भूमिकेचाही तपास केला जात आहे. या प्रकरणाची सूत्रधार निदा खान हिला पकडण्यावर आणि तिचे नेटवर्क समजून घेण्यावर एसआयटीचे लक्ष केंद्रित आहे.

Follow Us
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?.
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर.
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी.
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ.
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश.
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान.
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा.
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन.