‘या’ महिला डॉक्टरला तुम्ही नक्कीच कडक सॅल्युट कराल, कारण वाचून तुम्हीही म्हणाल क्या बात है…

| Updated on: Mar 29, 2023 | 5:17 PM

सर्व सुविधा असतानाही रुग्णावर उपचार करण्याऐवजी पळवटा शोधणाऱ्या डॉक्टरांच्या डोळ्यात अंजन घालणारी घटना नाशिकच्या निफाड मध्ये घडलीये. महिला डॉक्टरने केलेल्या कार्याचे जोरदार कौतुक होत आहे.

या महिला डॉक्टरला तुम्ही नक्कीच कडक सॅल्युट कराल, कारण वाचून तुम्हीही म्हणाल क्या बात है...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : राज्यातील आरोग्य विभाग अनेकदा चर्चेत येत असतो. त्यामध्ये विशेष करून सुविधा न मिळाल्याने आरोग्य विभाग टिकेचा धनी होत असतो. अनेकदा काही ठिकाणी डॉक्टर नसतात त्यामुळे आरोग्य विभागावर नाराजी व्यक्त केली जाते. त्यात ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा म्हणजे अक्षरशः तारेवरची कसरत असते. कधी औषधे असतात तर कधी डॉक्टर नसतात. आणि कधी डॉक्टर असल्यास औषधे नसतात. त्यामुळे आरोग्य विभाग नेहमी चर्चेत येत असतो. मात्र, नाशिकमधील एक महिला डॉक्टर चांगलीच चर्चेत आली आहे. डॉक्टरने केलेल्या कार्याची जिल्हाभरात चर्चा होत असून डॉक्टरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील घटना आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला डॉ. प्रियंका पवार यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्यांचे त्याबाबत कौतुक केले जात आहे.

डॉ. प्रियंका पवार या ड्युटीवर होत्या. त्याच दरम्यान मांजर गाव येथील एका 27 वर्षीय तरुणाने विष प्राशन केले होते. इतरांच्या मदतीने त्याला प्राथमिक आरोग्या केंद्रात आणण्यात आले. तरुणाला मोठा त्रास होत होता.

हे सुद्धा वाचा

डॉ. प्रियंका पवार यांनी तरुणाला तपासले आणि त्यामध्ये परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. तरुणाला तात्काळ उपचाराची गरज असल्याचे लक्षात आले. त्यामध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना निफाडला उपचार करण्यासाठी घेऊन जाणे अतिशय महत्वाचे होते.

मात्र, रुग्णवाहिका आहे पण त्याचा चालक रजेवर होता. डॉ. प्रियंका पवार यांनी रुग्णवाहिका चालवायला कुणीतरी हवे याबाबत चौकशी केली मात्र वेळ कमी असल्याने उशीर होईल हे लक्षात येताच त्यांनीच निर्णय घेतला.

प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका स्वतः चालविण्याचा निर्णय घेतला. डॉ. प्रियंका पवार यांनी रुग्णाला रुग्णवाहिकेत स्ट्रेचर टाकले आणि आरोग्य सेवकाच्या मदतीने निफाड घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. आणि स्वतः ड्रायव्हर म्हणून स्टेरिंग हातात घेतले आणि निफाड गाठले.

यातील विशेष बाब म्हणजे डॉ. प्रियंका पवार गरोदर आहेत. त्याचा कुठलाही विचार न करता त्यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवत सायंकाळच्या वेळेला निफाड गाठलं तरुणाचा जीव वाचविणे हाच हेतु त्यांच्या डोळ्या समोर होता.

खरंतर डॉ. प्रियंका पवार यांना रुग्णवाहिका चालविण्याचा कुठलाही अनुभव नाही. तरी देखील धाडस केले आणि विष प्राषन केलेल्या तरुणाचे प्राण वाचविले. तासाभरात तरुणावर उपचार सुरू झाल्याने डॉ. प्रियंका पवार यांना समाधान वाटले होते.

डॉ. प्रियंका पवार यांचे या कार्याबद्दल आरोग्य विभागासह ग्रामीण भागात जोरदार कौतुक होत आहे. यामध्ये डॉ. प्रियंका पवार या मात्र मी माझे काम केले. यामध्ये रुग्णाचे प्राण वाचविणे माझ्यासाठी अतिशय महत्वाचे असल्याच मत व्यक्त करत आहे.