AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Election : मविआची विधान परिषद निवडणुकीतून माघार? ठाकरे गटाची तातडीची पत्रकार परिषद, राजकारणात मोठा ट्विस्ट

आज विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्व पक्षीय उमेदवारांनी मोठी गर्दी केलीये, मात्र दुसरीकडे आता महाविकास आघाडीमधील मोठी बातमी समोर येत आहे.

Nashik Election : मविआची विधान परिषद निवडणुकीतून माघार? ठाकरे गटाची तातडीची पत्रकार परिषद, राजकारणात मोठा ट्विस्ट
uddhav thackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 01, 2026 | 3:03 PM
Share

राज्यात स्थानिक स्वारज्य संस्थेच्या 17 विधान परिषद जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या 18 जून रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दरम्यान आज या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज सर्वच पक्षातील उमेदवारांनी गर्दी केल्याचं चित्र आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी अनेकजण इच्छूक होते. मात्र उमेदवारी न मिळाल्यानं महायुती आणि माहाविकास आघाडीमध्ये काही ठिकाणी बंडखोरी झाल्याचं देखील पहायला मिळत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर होताच, ज्यांना संधी मिळाली नाही असे सर्वच पक्षाती इच्छूक अस्वस्थ  असल्याचं पहायला मिळत आहे.

दरम्यान नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे नाशिक विधान परिषद निवडणुकीमधून महाविकास आघाडी माघार घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिक विधान परिषदेच्या जागेसाठी वसंत गिते आणि अनिल कदम हे इच्छूक होते. परंतु अद्यापही महाविकास आघाडीकडून कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही, त्यामुळे आता नाशिक विधान परिषद निवडणुकीतून महाविकास आघाडीने माघार घेतली आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. आज दुपारी तीन वाजता या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे.  समजा जर महाविकास आघाडीने या निवडणुकीतून माघार घेतली तर नगरसेवक कोणाला मतदान करणार? असा प्रश्न  उपस्थित होत आहे.

महायुतीच्याही अडचणी वाढल्या 

दरम्यान दुसरीकडे ही जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला सुटल्यामुळे आता या ठिकाणी महायुतीच्या देखील अडचणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे.  गणेश गीते यांना नाशिकमध्ये भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी बंडखोरी केली आहे.  गणेश गीते हे आज पुन्हा नव्याने फॉर्म भरणार आहेत. ते नवीन फॉर्म भरण्यासाठी निवडणूक कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत. गणेश गिते यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना शिंदे गटापुढे मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.

Follow Us
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत