AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू आमच्या जातीची नाहीस… प्रेमविवाह केलेल्या तरुणीचा 8 वेळा गर्भपात; नाशिकमधील महाजन कुटुंबाचं संतापजनक कृत्य समोर

नाशिकमध्ये प्रेमविवाह करणाऱ्या विवाहितेचा जात वेगळी असल्याच्या कारणावरून तब्बल ८ वेळा गर्भपात घडवून आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

तू आमच्या जातीची नाहीस... प्रेमविवाह केलेल्या तरुणीचा 8 वेळा गर्भपात; नाशिकमधील महाजन कुटुंबाचं संतापजनक कृत्य समोर
Nashik (फोटो प्रातिनिधिक)
| Updated on: May 21, 2026 | 10:54 AM
Share

प्रेमविवाह करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहितेसोबत नाशिकमध्ये अत्यंत अमानुष आणि संतापजनक प्रकार घडल्याची घटना उघडकीस आली आहे. तू आमच्या जातीची नाहीस, असे म्हणत तिचा सासरच्या मंडळींनी छळ तर केलाच, पण त्याहूनही भयंकर म्हणजे या विवाहितेचा तब्बल ८ वेळा गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘जात वेगळी’ म्हणून मानसिक छळ आणि सक्तीने गर्भपात

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा प्रेमविवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत होते. असे असतानाच तिच्या सासूने “तू आमच्या जातीची नाहीस, तुझ्या मुलांना आम्ही स्वीकारणार नाही,” असे टोमणे मारण्यास सुरुवात केली. यानंतर सासूकडून विवाहितेवर गर्भपातासाठी दबाव आणण्यात गेला. यानंतर सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. या अमानुष छळादरम्यान सासरच्यांनी विवाहितेची इच्छा नसतानाही तिचा तब्बल ८ वेळा गर्भपात घडवून आणला, असे तक्रारीत म्हटले आहे.

वेडी ठरवून रुग्णालयात टाकू, सासरच्यांची धमकी

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, सासू आणि सासऱ्यांनी तिला वारंवार शिवीगाळ करत मानसिक छळ केला. हा अत्याचार एवढ्यावरच थांबला नाही, तर तुला वेडी ठरवून मेंटल हॉस्पिटलला ॲडमिट करू, अशी धमकीही तिला सातत्याने देण्यात आली. पीडित महिला आणि तिचा पती सुरुवातीला पुण्यात नोकरी निमित्त राहत होते. मात्र, पुढाकार घेऊन नोकरी गेल्यानंतर जुलै २०२५ मध्ये ही महिला नाशिकला परतली. नाशिकमध्ये आल्यानंतर तिच्यावरील छळाचे प्रमाण अधिकच वाढले.

घर घेण्याच्या बहाण्याने दागिने लाटले

शारीरिक आणि मानसिक छळासोबतच विवाहितेची आर्थिक फसवणूकही करण्यात आली. नाशिकमध्ये स्वतःचे घर खरेदी करायचे आहे, असे सांगून पतीने विवाहितेचे सोन्या-चांदीचे दागिने मोडून पैसे हडप केले. याशिवाय माहेरून आणखी पैसे आणि हुंडा आण यासाठी सतत तिच्यावर सतत दबाव टाकला जात होता. केवळ जात वेगळी असल्याच्या कारणावरून तिला घरात सन्मानाने जगू दिले जात नव्हते.

या सासरच्या जाचाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलिसांनी खालील संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजय दशरथ महाजन (पती), निर्मला दशरथ महाजन (सासू), दशरथ तुकाराम महाजन (सासरे) या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेमुळे नाशिकमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणाची म्हसरूळ पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.

Follow Us
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?