AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat: अशोक खरात याचा जीव घाबराघुबरा, सर्व यंत्रणाच मागे लागल्या, ती मोठी अपडेट काय?

Ashok Kharat ED, IT, SIT: अशोक खरात याचा जीव घाबराघुबरा झाला आहे. सर्वच यंत्रणा त्याच्या मागे लागल्याने त्याचा पाय खोलात आहे. खरातच्या इतर मालमत्ताही रडारवर आल्या आहेत. तर त्याला मदत करणाऱ्या अनेकांच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat: अशोक खरात याचा जीव घाबराघुबरा, सर्व यंत्रणाच मागे लागल्या, ती मोठी अपडेट काय?
अशोक खरातImage Credit source: एजन्सी
| Edited By: | Updated on: Apr 10, 2026 | 9:20 AM
Share

Ashok Kharat ED, IT, SIT: भोंदू अशोक खरात याला मोठा दणका बसणार आहे. त्याच्या मागे सर्वच यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. तर त्याला मदत करणाऱ्यांचाही पाय खोलात जाण्याची शक्यता आहे. खरातच्या इतर मालमत्ताही रडारवर आल्या आहेत. तर अनेक ठिकाणी पुन्हा धाडसत्र आणि चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. जमीन खरेदी विक्रीचे मूळ दस्तावेज व बँक अकाउंटचा तपशील ताब्यात घेण्यात आल्याने त्याची कुंडली समोर येणार आहे. अशोक खरातला काल एका प्रकरणात पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

खरात प्रकरणी ED आणि IT विभाग ॲक्शन मोडवर

भोंदू अशोक खरात प्रकरणी ED आणि IT विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. ठाणे येथील कार्यालयात आयकर विभाग व ईडी यांची संयुक्त बैठक झाली आहे. याविषयीची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन्ही संस्थांमार्फत भोंदू अशोक खरात याच्या कागदपत्रांची छाननी सुरू करण्यात आली आहे. लवकरच खरातची मालमत्तांवर धाडसत्र राबवले जाणार असल्याची माहितीही समोर येत असल्याने आता तपासाची व्याप्ती अजून वाढण्याची शक्यता आहे.

ईडीने दोन दिवसांपूर्वीच भोंदू अशोक खरात संबंधित असलेल्या जमीन खरेदी विक्रीचे मूळ दस्तावेज व बँक खात्याचा तपशील ताब्यात घेतला आहे. त्याचा अभ्यास केल्यानंतर लवकरच खरातविरोधात मोठी कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे. SIT सोबतच ED आणि IT विभागाकडून देखील खरात भोवतीचा फास आवळला जाणार आहे. त्यामुळे त्याच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातील. त्याच्या सहकारी पतसंस्थामध्ये 100 हून अधिक खाती असल्याचे समोर आले आहेत. ही खाती विविध लोकांच्या नावे होती. त्यात तो वारसदार होता. तर काही मालमत्ता त्याच्या नावावर आढळल्या आहेत.

ती महिला आणि पुरूष कोण?

गर्भवती महिलेवर भोंदू खरातने अत्याचार केले. त्या गुन्ह्यातील प्रकरणाचा तपास करताना एसआयटीला पुरावे मिळाले आहेत. या रजिस्टरमध्ये एकच व्यक्ती किमान तीन ते चार वेळा भोंदू खरात याच्या कार्यालयात येऊन गेल्याची नोंद आढळली आहे. असे एकूण 10-12 जण आढळले आहेत. त्यात महिला भाविकांचाही समावेश आहे.

Follow Us
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या PRO बाबत
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या दिवंगत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख...
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख... 2 कोटी 7 लाख लोकांची नावे वगळली
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय?
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...