भास्कर जाधव यांची शिंदे-भाजप सरकारवर टीका, पोलीस बदल्यांचा सपाटा कशासाठी?

| Updated on: Nov 30, 2022 | 9:44 PM

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यपद्धतीत काही फरक आहे, असं मला वाटत नाही.

भास्कर जाधव यांची शिंदे-भाजप सरकारवर टीका, पोलीस बदल्यांचा सपाटा कशासाठी?
भास्कर जाधव
Follow us on

चैतन्य गायकवाड, प्रतिनिधी, नाशिक – मंत्रालयात भोंगळ कारभार सुरू आहे. पोलिसांच्या बदल्या केल्या जात आहेत. प्रशासनाचा खेळखंडोबा सुरू आहे, अशी घणाघाती टीका भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर केली. मुंबई मनपाशी संबंधित असलेल्या बदल्या सुरू आहेत. मंत्रालयात अनागोधी कारभार आहे. ते हाती लागेल तेवढं पदरात पाडून घ्या, अशा खोके सरकारचा कारभार सुरू असल्याचं भास्कर जाधव म्हणाले. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची राजकीय युती झाल्यानंतर नाशिकमध्ये हा पहिलाच कार्यक्रम होतोय. तुम्ही सगळे लोक माझ्यापेक्षा खूप कडक आहात. आपल्या सर्वांचं राजकीय ध्येय शिवसेनेच्या साथीने पूर्ण व्हावं, ही इच्छा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार हा देश चालवायचा आहे. गेली सात आठ वर्ष या देशात असे निर्णय घेतले जात आहे की, सर्व स्वायत्त संस्था अबाधित राहणार का, अशी भीती निर्माण होत आहे. या सत्ताधारी पक्षाला वाटत आहे की, आमच्याशी दोन हात करायला या देशात कुणीही नाही. या देशातील संविधान आम्ही मोडीत काढू देणार नाही, असा इशाराही भास्कर जाधव यांनी दिला.

2024 साली या देशातील सर्व छोटे मोठे घटक एकत्र होतील. 2019 साली उद्धव ठाकरे युती करण्यासाठी भाजपच्या दारी गेले नव्हते. अमित शहा यांनी अनेक आश्वासने देऊन स्वतःहून युती करून घेतली. त्यांनी उद्धव साहेबांच्या घराचे उंबरठे झिजवून युती करायला भाग पाडलं.

अंधेरी निवडणुकीत ‘मुर्गी पटेल यांची लोक भुर्जी करतील’ हे भाजपला कळलं होतं. CPM च्या लोकांनी देखील पाठिंब्याचे पत्र दिलं. या देशातील अनागोंदी विरोधात सर्व एकत्र होत आहेत. त्यातच आता संभाजी ब्रिगेड देखील एकत्र आली असल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं.

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यपद्धतीत काही फरक आहे, असं मला वाटत नाही. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की ज्याने कधीही जात पात बघितली नाही. तुम्ही देखील (संभाजी ब्रिगेड) शिवरायांचा भगवा ध्वज घेऊन जात आहात. त्यामुळे तुमचं आमचं जमायला काही हरकत नाही.

पंतप्रधानांची नक्कल केली की केस दाखल होते. सध्या आमच्यावर फक्त केसेस सुरू आहे. 75 हजार रोजगार दिले हे काय खरं असेल असं मानायचे कारण नाही. भास्कर जाधवला सांगितलेलं काम कधी झालं नाही, असं कधी होणार नाही. असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.