AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात घातले, पण सरकार पडणार नाही, देवही म्हणतात आम्हाला पाण्यातून बाहेर काढा; राऊतांची सुस्साट टोलेबाजी

गांजाच्या नशेत कोणी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर नशेत ते पडतील. सरकार पडणार नाही, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर केली होती. (maha vikas aghadi government strong, says sanjay raut)

सरकार पाडण्यासाठी देव पाण्यात घातले, पण सरकार पडणार नाही, देवही म्हणतात आम्हाला पाण्यातून बाहेर काढा; राऊतांची सुस्साट टोलेबाजी
sanjay raut
| Edited By: | Updated on: Oct 24, 2021 | 4:58 PM
Share

नाशिक: गांजाच्या नशेत कोणी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर नशेत ते पडतील. सरकार पडणार नाही, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर केली होती. त्यानंतर त्यांनी विरोधकांना पुन्हा एकदा खोचक टोला लगावला आहे. सरकार पाडण्यासाठी यांनी देव पाण्यात घातले. पण सरकार पडणार नाही. देवही म्हणतात आम्हाला पाण्यातून बाहेर काढा, अशी सुस्साट टोलेबाजी संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत यांनी सभेला संबोधित करताना जोरदार टोलेबाजी केली. सरकार पाडण्यासाठी भाजप देव पाण्यात घालून बसली आहे. पण सरकार पडणार नाही. आता देवही म्हणतात आम्हाला पाण्यातून काढा, असा चिमटा त्यांनी काढला. अन्याय सहन करू नका हे शिवसेनेचे ब्रीद आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही. निकाल लागल्यानंतर शब्द फिरवले गेले. हे सरकार अन्यायाच्या चिडीतून निर्माण झाले आहे. हे सरकार चालत आणि चालणार. आम्हाला चांगली झोप लागते. पाटील म्हटले आम्हाला झोप लागेल. पण भाजप सरकार घालवले तेव्हापासून चांगली झोप लागते, असा टोला त्यांनी लगावला.

जास्त आमदार निवडून आणावे लागेल

जास्त आमदार आता निवडून आणावे लागेल. भाई आहोत, जसे तुम्ही इकडचे भाई आहात. सुहास कांदे शिवसेनेच्या आमदारकीला न्याय देतात. लोक म्हणतात आम्ही अभ्यास करत नाही. तुमच्यावर अन्याय झालाय हे पटवून जो देतो तो उत्तम लोकप्रतिनिधी मानला जातो, असं ते म्हणाले.

कांदेंमुळे नांदगाव चर्चेत

या मतदारसंघात भुजबळांची हवा आहे. पण मी म्हटलं नांदगावची जागा मिळणार नाही. या भागाला आमदार आहे की नाही तेच कळत नाही. मात्र आता नांदगाव महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला तो फक्त सुहास कांदे आमदार असल्यामुळे, असंही त्यांनी सांगितलं. अतिवृष्टी झाली त्यामुळे मायबाप सरकारने मदत केली पाहिजे. मग आम्ही कोणाकडे हातपाय पसरायचे? कोणी त्याच्या घरच्यासाठी मागत नाही, सरकारकडे मागण्याचा अधिकार आमदार, जनतेला आहे. प्रसंगी खेचून आणण्याचा अधिकार आहे. वीज बिल माफ करा आम्ही सांगत नाही, सवलत द्या असं सांगतोय, असंही त्यांनी सांगितलं.

एकदा भुजबळांना पाहुणचाराला बोलवा

अत्यंत तळमळीने सुहास कांदे यांनी विषय मांडले. एखाद्या आमदाराला आपल्या मतदारसंघाबद्दल किती आत्मियता आहे हे यातून दिसून येतं. सुहास कांदे पाहुणचार चांगला करतात. एकदा भुजबळांना बोलवा पाहुणचाराला. करून तर पाहू, असं सांगतानाच आता भगवा खाली येणार नाही. आपण भुजबळ याना सांगू नांदगावचा नाद सोडा. आज नाशिकला लाल दिवा आहे. उद्या नांदगावला मिळेल. महाविकास आघाडी सरकार झालं नसत तर ते मंत्री झाले असते का? अन् आज आमच्यावर अन्याय करता? तुम्ही शिवसेनेत होता म्हणून तुम्ही राजकारणात टिकला, असा चिमटा त्यांनी भुजबळांना काढला.

संबंधित बातम्या:

समीर वानखेडेसह एनसीबीवर पंचाचाच बाँब, शाहरुख खानकडे 25 कोटी मागितल्याचा दावा, वानखेडेला 8 कोटी द्या!

गोसावीच्या बॉडीगार्डचे एनसीबीविरोधात खळबळजनक दावे; नवाब मलिक म्हणतात, एसआयटीमार्फत चौकशी करा

Sanjay Raut : ‘त्या’ व्हिडीओमध्ये आर्यन कुणाशी बोलतोय? संजय राऊतांकडून खळबळजनक व्हिडीओ शेअर

(maha vikas aghadi government strong, says sanjay raut)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.