‘या’ शहरात शासनाच्या जीआरचीच केली होळी; कर्मचाऱ्यांनी एकजुटीने शासनाला खडे बोल सुनावले

| Updated on: Mar 15, 2023 | 4:15 PM

ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनीदेखील आंदोलनात सहभाग नोंदवला असून उद्धव ठाकरे यांची मालेगावात होणाऱ्या सभेत हा विषय उचलून धरण्याचे आवाहन करण्यात आले आहे

या शहरात शासनाच्या जीआरचीच केली होळी; कर्मचाऱ्यांनी एकजुटीने शासनाला खडे बोल सुनावले
Follow us on

मालेगाव : “जगण्याचा आधार आहे जुनी पेन्शन, म्हातारपणाची साथ आहे जुनी पेन्शन, आयुष्यभराची कमाई आहे जुनी पेन्शन, म्हातारपणाची काठी आहे जुनी पेन्शन” या घोषणा देत मालेगावामध्ये एका चिमुकलीने आपल्या बोबड्या बोलामध्ये जुनी पेन्शन कशासाठी त्याचा अर्थ सांगितला आहे. यावेळी दिलेल्या चिमुकलीने दिलेल्या घोषणेला शासकीय कर्मचाऱ्यांनी साथ दे पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची म्हणत सरकारविरोधात रोष व्यक्त केला आहे. आपल्या माणसांसाठी चिमुकलीने मालेगावमध्ये पुकारलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला जोरदार पाठिंबा दर्शवत सरकारने कोणतंही घेऊ नये टेन्शन,तात्काळ सुरू करावी जुनी पेन्शन अशी मागणी चिमुकलीने केल्यामुळे मालेगावातील आंदोलनाकडे साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मालेगाव शहर परिसरातील शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजनेसाठी पुकारलेल्या काम बंद आंदोलनत मोठ्या संख्येने सहभाग दर्शवत सरकारविरोधातही जोरदार घोषणाबाजी केली आहे.

पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची,एकच मिशन-जुनी पेन्शन, न्याय मागतो भीक नाही, सरकारची नियत ठीक नाही, कर्मचारी एकजुटीचा विजय असो कर्मचाऱ्यांच्या या घोषणेमुळेही मालेगाव तहसील कार्यालय कर्मचारी संघटनांनी जिल्हा परिषदेचे आवार दणाणून सोडले आहे.

मालेगावातील जुनी पेन्शन योजनेच्या आंदोलनात चिमुकल्यांनी सहभाग नोंदवून कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारकडे पोहचवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

मालेगावात झालेल्या आंदोलनात शासकीय कर्मचाऱ्यांनी शासनाच्या जीआरचीही होळी करून सरकारविरोधात असलेला आवाज बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मालेगाव परिसर आता सरकार विरोधातील घोषणांनी दणाणून गेला आहे.

मालेगावमधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात माहविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.

तर ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनीदेखील आंदोलनात सहभाग नोंदवला असून उद्धव ठाकरे यांची मालेगावात होणाऱ्या सभेत हा विषय उचलून धरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या संपामध्ये आरोग्य कर्मचारी,जि. प. कर्मचारी, लिपीक राज्य सरकारी, जिल्हा परिषद, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर, महानगरपालिका, नगरपालिका,नगरपरिषदा, नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र मार्फत राज्य सरकारी जिल्हा परिषद, निमसरकारी, शिक्षक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी झाले आहेत.