AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik IT Company: TCS कंपनीतील आरोपींचे दिल्ली ब्लास्टमधील आरोपींसोबत कनेक्शन? ती लिंक समोर आल्याने मोठी खळबळ

Nashik IT Company Accused Connection with Delhi Blast?: नाशिकमधील टीसीएस या आयटी कंपनीत धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. यातील आरोपींचे दिल्ली बॉम्ब ब्लास्टमधील आरोपींशी कनेक्शन असल्याचा धक्कादायक दावा करण्यात येत आहे. काय आहे अपडेट?

Nashik IT Company: TCS कंपनीतील आरोपींचे दिल्ली ब्लास्टमधील आरोपींसोबत कनेक्शन? ती लिंक समोर आल्याने मोठी खळबळ
नाशिक आयटी कंपनी, दिल्ली बॉम्ब स्फोटातील आरोपींशी कनेक्शन?Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Apr 16, 2026 | 11:03 AM
Share

Nashik IT Company Accused Connection with Delhi Blast?: नाशिकमधील आयटी कंपनी टीसीएसमध्ये महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शौषण आणि धर्मांतरण केल्याप्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असतानाच आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. टीसीएस प्रकरणातील आरोपीचं दिल्ली स्फोटातील आरोपीसोबत कनेक्शन असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याप्रकरणातील फरार एचआर मॅनेजर निदा खान ही दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची दिशाच बदलली आहे. हे प्रकरण कुणावर शेकणार आणि नाशिकमध्ये अजून काही असे प्रकार सुरू आहेत का? नाशिक येथे कुंभमेळा होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर हाती येत असलेली माहिती यंत्रणांचे टेन्शन वाढवणारी आहे.

निदा खानचे दिल्ली स्फोटातील आरोपींशी कनेक्शन?

टीसीएस नाशिक प्रकरणातील एचआर मॅनेजर निदा खान फरार आहे. ती सध्या भिवंडीत लपल्याची माहिती सूत्रांनी दिली. निदा खानचा दिल्ली ब्लास्टमधील डॉक्टर शहीनशी लिंक असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. या कनेक्शनमुळे तपासाला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने जोडून पाहण्यात येत आहे. पोलिसांकडून विविध ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे. संशयास्पद माहिती तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात कळवण्याचं आवाहन करण्यात आले आहे. टीसीएस प्रकरणात लैंगिक अत्याचार, धर्मांतराचे आरोप करण्यात आले आहेत. तपास यंत्रणांकडून सर्व बाजूंनी सखोल चौकशी सुरू आहे. पुढील काही दिवसांत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

पुढील काही दिवसांत मोठे खुलासे होण्याची शक्यता

नाशिक येथील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणाचा तपास आता दहशतवाद तपास पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला आहे. नाशिक शहरात एटीएसचे पथक दाखल, एक अधिकारी आणि तीन कर्मचारी यांनी तपास सुरू केला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये होणाऱ्या प्रकाराची केंद्रीय तपास यंत्रणांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. नाशिक शहर पोलीसांकडून याबाबतची माहिती तक्रारदारांकडून घेतली जाणार आहे. स्वत: एटीएस आरोपींची चौकशी करणार आहे. तपासासाठी सी डी आर रिपोर्ट महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

धर्मांतरण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

जे लोक हिंदूंच्या मुलींचं धर्मांतरण करत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी भाजप नेत्या आणि आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे. हिंदुस्थानमध्ये अशा घटना आम्ही खोवून घेणार नाही. मतांचे राजकारण करणाऱ्यांनी आपले तोंड उघडावे. आरोपींच्या घरांवर बुलडोझर फिरवा, त्यांचे राष्ट्रीयत्व रद्द करा. आरोपींचे वकीलपत्र घेणाऱ्यांनी देखील याचा विचार करावा. आज आम्ही या विरोधात भव्य मोर्चा काढतो आहोत. या आरोपींचे कनेक्शन शोधायला हवे. गृहमंत्रालयाने स्वतः ही प्रकरण शोधून काढून कारवाई केली आहे, असे फरांदे म्हणाल्या.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!