AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहो, ही टाटांचीच कंपनी आहे ना? धर्मांतरण आणि लैंगिक शोषणप्रकरणात अजब दावा, तुमचाही संताप होणार…टीसीएस म्हणाली काय?

Nashik IT Company TCS: नाशिकच्या युनिटमध्ये धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकार उघडकीस आल्यानंतर आता टीसीएसने अजब दावा केला आहे. कंपनीच्या दाव्याने संतापाची लाट उसळली आहे. प्रकरणात अनेक घडामोडी समोर आल्या आहेत.

अहो, ही टाटांचीच कंपनी आहे ना? धर्मांतरण आणि लैंगिक शोषणप्रकरणात अजब दावा, तुमचाही संताप होणार...टीसीएस म्हणाली काय?
नाशिक आयटी कंपनीImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 21, 2026 | 12:16 PM
Share

Molestation And Conversation Case: नाशिक येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेज (TCS) युनिटमध्ये कथित धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाप्रकरणात हादरवणारे खुलासे समोर येत आहे. पीडितांच्या जबाबातून कंपनीत इतके भयानक प्रकार सुरू असताना युनिट हेड आणि व्यवस्थापन काय करत होते असा सवाल करण्यात येत आहे. तर आता याप्रकरणात कंपनीच्या नवीन खुलाशाने संतापाची लाट उसळली आहे. पोलीस तपासात कंपनीने अजब दावा केला आहे. कार्यालयीन अंतर्गत तक्रार निवारण कक्षाकडे (Internal Complaint System) कोणीच तक्रार केला नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. ज्याअर्थी कंपनीचे वरिष्ठच या प्रकरणातील आरोपी असताना तक्रार केली असली तरी ती वरिष्ठांपर्यंत कशी पोहचणार हे मात्र कंपनीला सांगता आले नाही. कंपनीच्या एकूणच हेतूवर आणि कारभारावर संताप व्यक्त केल्या जात आहे.

कोणीच पॉशची तक्रार नाही केली

TCS कडून याविषयी शुक्रवारी वक्तव्य करण्यात आले. कार्यालयाच्या अंतर्गत प्राथमिक तपासात कंपनीच्या एथिक्स आणि लैंगिक छळाविषयीच्या पॉश यंत्रणेकडे एकही तक्रार आली नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. जर वरिष्ठांची मिलीभगत असताना, एचआर पासून युनिट हेडपर्यंत सर्वच या षडयंत्राचे भाग असतील तर दबावात कोण तक्रार करणार याचे उत्तर मात्र कंपनीकडे नाही. कंपनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांनी कार्यालयात जाऊन याविषयीचा तपास केला आहे.

टीसीएसची ओव्हरसाईट कमिटी

इतके मोठे कांड कंपनीत झाल्यावर व्यवस्थापन आता खडबडून जागे झाले आहे. कंपनीने गांभीर्य लक्षात घेत आणि हिंदुत्ववादी संघटनांचा दबाव पाहता ओव्हरसाईट कमिटी स्थापन केली आहे. स्वतंत्र निदेशक आणि ज्येष्ठ वित्तीय तज्ज्ञ केकी मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी टीसीएसच्या प्रमुख ऑपरेटिंग अधिकारी आर्थी सुब्रमण्यम करत आहेत. ही समिती लवकरच अहवाल सादर करणार आहे. इतकेच नाही तर प्रकरणाची गंभीरता पाहता कंपनीने कन्सल्टन्सी फर्म डेलॉयट आणि कायदेशीर सल्लागार संस्था टायलीगल यांना याप्रकरणी स्वतंत्र सल्लागार म्हणून नेमले आहे. त्यामुळे हे प्रकरण सर्वच स्तरातून आणि सर्व बाजूने तपासण्यात येत आहे. पण प्राथमिक तपासाच्या आधारावरच थातूरमातूर उत्तर देण्याचा प्रयत्न कंपनीने केल्याचे समोर येत आहे. संवेदनशील प्रकरणात कंपनीच्या वरिष्ठांनी तरी निदान बाजू मांडण्याची घाई करू नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...