AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनसेकडून अमोल मिटकरींना श्वान आणि बिस्किट भेट; आंदोलनाचाही इशारा

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं. (nashik MNS agitation against NCP MLA Amol Mitkari)

मनसेकडून अमोल मिटकरींना श्वान आणि बिस्किट भेट; आंदोलनाचाही इशारा
amol mitkari
| Edited By: | Updated on: Aug 21, 2021 | 11:36 AM
Share

नाशिक: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे मनसे कार्यकर्ते संतापले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींना श्वान आणि बिस्किट दिलं असून आंदोलनाचा इशाराही दिला आहे. (nashik MNS agitation against NCP MLA Amol Mitkari)

राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नाशिकचे मनसे कार्यकर्ते संतापले आहेत. मनसेने अमोल मिटकरींना श्वान आणि बिस्कीट भेट दिले. तसेच मिटकरीं विरोधात जोरदार मनसैनिकांनी घोषणाबाजीही केली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मनसे काय आहे हे नाशिकचे मनसैनिक दाखवून देतील असा इशाराही दिला आहे.

गाडी फोडण्याचा इशारा

मनसेचे पुणे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभाग प्रमुख जगदीश खांडेकर यांनी मिटकरी यांना थेट गाडी फोडण्याची धमकी दिली आहे. मंत्रालयात जाताना गाडीच्या काचा काळ्या करा, अन्यथा गाडीत दिसल्यास मिटकरींना फोडू, अशी खुली धमकी खांडेकर यांनी दिलीय. त्यामुळे आता हा वाद पेटणार असं दिसतंय. जगदीश खांडेकर म्हणाले, “महाराष्ट्रात आमदार अमोल मिटकरी हा एक बाजारू विचारवंत आलाय. मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय असा द्वेष निर्माण करुन राष्ट्रद्रोह केल्याचा आरोप केलाय, पण त्यांनी राष्ट्रद्रोह म्हणजे काय हे आधी समजून घ्यावं. एखादा व्यक्ती राष्ट्रद्रोही आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार भारतीय संविधानाने ठरवून दिलेल्या कायद्याचं काम आहे. मग मिटकरी भारतीय संविधानापेक्षा मोठा झालाय का? राज ठाकरे यांच्यावर बोलण्याएवढी मिटकरी यांची लायकी नाही.”

अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले?

‘राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करून “राष्ट्रद्रोह” केला ती व्यक्ती! अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे’, अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

अजूनही आपण जातीपातीमध्ये खितपत पडलो आहोत. स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही निवडणुकीत भाषणं होतात तेव्हा सगळ्यांकडून सारखं रस्ते, पाणी, विज अशी तिच तिच आश्वासनं दिली जात आहेत. तेव्हा एवढ्या वर्षात आपण काय केलं हे शोधलं पाहिजे. साधारणपणे आपण 99 साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 99 नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले. (nashik MNS agitation against NCP MLA Amol Mitkari)

संबंधित बातम्या:

राज ठाकरेंच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचं पुन्हा एकदा प्रत्युत्तर, राज यांच्यावर थेट ‘राष्ट्रद्रोहा’चा आरोप!

“राज ठाकरे जातपात मानत नाही, मग दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी नाव देण्यास विरोध का केला?”

‘राष्ट्रवादीने महाराष्ट्रात जातीचं विष पेरलं, दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंवर टीका करु नये’

(nashik MNS agitation against NCP MLA Amol Mitkari)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...