Nashik Accident: सप्तश्रृंगी गड परिसरात भीषण अपघात, भरधाव कारची पोलिसांसह भाविकांना जोरदार धडक, पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू तर…
Nashik Nanduri Accident : ऐन नवरात्रीत पोलीस बंदोबस्तातील पोलीस उपनिरिक्षकाच्या कुटुबांवर मोठे संकट कोसळले आहे. एक भरधाव कार थेट भाविक आणि बंदोबस्तावरील पोलिसांच्या अंगावर धडकल्याने सप्तश्रृंगी गड परिसरात मोठी धावपळ उडाली.

Nashik Nanduri Accident : सप्तश्रृंगी गड परिसरात भीषण अपघात घडला. नांदुरी येथे भरधाव कारची बंदोबस्तावरील पोलिसांना जोरदार धडक दिली. अपघातात ग्रामीण पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर 11 हुन अधिक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह भाविकही या धडकेत गंभीर जखमी झाले. नवरात्रीच्या उत्सवावर संकट कोसळले. बॅरिकेटिंग लावलेली असताना आणि मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही हा भीषण अपघात झाला. सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याशीच ही घटना घडल्याने अनेक भाविकांच्या आणि पोलिसांच्या मनाला चटका लागला.
पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू, 11 हून अधिक जण गंभीर जखमी
नाशिक जिल्ह्यातील नांदुरी येथे भरधाव कारची बंदोबस्तावरील पोलिसांना जोरदार धडक दिली. वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षकाचा त्यात मृत्यू झाला. विजय गायकवाड असे या घटनेत मृत्यूमुखी पडल्या पोलिस उपनिरीक्षकांचे नाव आहे. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर 11 हुन अधिक पोलीस अधिकारी, कर्मचार्यांसह भाविकही या धडकेत गंभीर जखमी झाले. नांदुरीच्या अभोणा चौफुलीवरील ही घटना घडली. जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमींना नाशिकला उपचारासाठी हलविलण्यात आले आहे. नवरात्रोत्सवानिमित्त नांदुरी गावात मोठ्या प्रमाणात बॅरेकेटींग करण्यात आले आहे.
भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
नांदुरीत भरधाव सियाज कारने पोलिसांना भाविकांना जोरदार धडक दिली. अभोना वळण रस्त्यावर मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास अपघात झाला. धडक दिल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेमुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बंदोबस्तावरील पोलीस हे वाहन व्यवस्थेचे काम करत असतानाच हा भीषण अपघात घडला. ही कार वणीकडून येत असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमींना नाशिक येथील सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या कारने घटनास्थळी पोहचण्यापूर्वी इतर वाहनांसुद्धा धडक दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याचाही तपास करण्यात येत आहे. स्थानिक पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
