AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सडकसख्याहरींना नाशिकमधील ‘भोसला’च्या विद्यार्थिनींचा हिसका; छेडछाडीनंतर चोप देऊन उतरवली मस्ती!

टवाळखोरांची मस्ती इतकी चढली होती की, त्यांनी समज देणाऱ्या विद्यार्थिनीची पुन्हा छेड काढली. एका बहाद्दराने आपल्या तोंडातील गुटखा मुलीच्या पायावर थुंकला. त्यानंतर पुन्हा विद्यार्थिनी जाब विचारायला गेल्या. तेव्हा त्याने त्यांना धक्के मारायला सुरुवात केली. एका मुलाने तर चक्क हात उगारला. त्यानंतर मात्र...

सडकसख्याहरींना नाशिकमधील ‘भोसला’च्या विद्यार्थिनींचा हिसका; छेडछाडीनंतर चोप देऊन उतरवली मस्ती!
प्रातिनिधिक छायाचित्र.
मनोज कुलकर्णी
मनोज कुलकर्णी | Updated on: Apr 05, 2022 | 1:47 PM
Share

नाशिकः नाशिक (Nashik) येथील सोमेश्वराच्या देवदर्शनाला गेलेल्या मुलींची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांना भोसला मिलिटरी स्कूलच्या (Bhosla Military School) विद्यार्थिनींनी चांगलाच हिसका दाखवला. एकदा समजावून सडकसख्या हरी शांत झाले नाहीत. त्यांनी पुन्हा छेड काढलीच. त्यामुळे या विद्यार्थिनींनी स्वसंरक्षणाचा खाक्या दाखवत त्यांना चांगलाच चोप दिला. या कामगिरीबद्दल भोसला मिलिटरी स्कूलकडून या विद्यार्थिनींना रामदंडी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, भोसला कॉलेजच्या दहा विद्यार्थिनी पास घेऊन सोमेश्वर (Someshwar) येथे सहल आणि देवदर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शनानंतर यातील काही विद्यार्थिनींनी थंडगार बर्फ गोळा चाखण्याकडे मोर्चा वळवला. त्यावेळी त्यांच्या शेजारी पाच ते सहा टवाळखोर उभे होते. त्यांनी या मुलींना टोमणे मारायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांची मजल अपशब्द उच्चारण्यापर्यंत गेली. तरीही मुलींनी त्याकडे दुर्लक्ष गेले. शिवाय असे बोलू नका, अशी समज दिली. मात्र, तरीही टवाळखोरांनी त्यांची छेड काढली.

गुटखा अंगावर थुंकला

टवाळखोरांची मस्ती इतकी चढली होती की, त्यांनी समज देणाऱ्या विद्यार्थिनीची पुन्हा छेड काढली. एका बहाद्दराने आपल्या तोंडातील गुटखा मुलीच्या पायावर थुंकला. त्यानंतर पुन्हा विद्यार्थिनी जाब विचारायला गेल्या. तेव्हा त्याने त्यांना धक्के मारायला सुरुवात केली. एका मुलाने तर चक्क हात उगारला. त्यानंतर मात्र, मुलीच्या संयमाचा बांध सुटला. त्यांचा रुद्रावतार पाहून या मुलांची पळता भुई थोडी झाली.

पोलिसांनीही दिला दणका

भोसला मिलिटरी स्कूलमध्ये विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे दिले जातात. विद्यार्थिनींना त्याचा इथे उपयोग केला. त्यांनी या टवाळखोरांना अक्षरशः धू-धू धुतले. त्यातील एकाने आपल्या फोनवरून इतर मुलांना फोन करून बोलावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलींनी त्यालाही अद्दल घडवली. थेट पोलिसांच्या 100 क्रमांकावर डायल करून मदत मागवून घेतली. त्यानंतर पोलिसांनीही त्यांचा पाहुणचार केला. या मुलींसमोरच टवाळखोरांना उठाबशा काढायला लावल्या. या प्रकारानंतर मुलींनी वसतिगृहाकडे धाव घेतली.

पालकांनो लक्ष द्या…

पालकांनो आपल्या मुलाकडे जरूर लक्ष द्या. या टवाळखोरांमध्ये आपला मुलगा तर नाही ना, याची खात्री करून घ्या. त्यांना चांगल्या सवयी लावा. महिला घरातील असो की, बाहेरची. नातेलगांमधील असो की, दूरची. त्यांचा सन्मान करायला आणि आदर ठेवण्याचे धडे त्यांंना जरूर द्या. अन्यथा असे काही होऊन बसेल की, तुम्हाला मानही वर काढता येणार नाही, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...