AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, शरद पवार यांनी सुनावलं

तुमच्या हातात देशाची सत्ता आहे. या सत्तेचा वापर करून चौकशी करा. दोषींना शिक्षा करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असंही शरद पवार म्हणाले.

वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, शरद पवार यांनी सुनावलं
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jul 08, 2023 | 6:54 PM
Share

नाशिक : राजकारण सामान्य माणसासाठी काम करायचं असतं. स्वातंत्र्याचा इतिहास मोठा आहे. स्वातंत्र्यासाठी नाशिकच्या नेत्यांनी ऐतिहासिक काम केलं. स्वातंत्र्य चळवळीमध्ये हा जिल्हा सक्रिय राहिला. देश परकियांच्या जोखडातून मुक्त झाला पाहिजे. यासाठी नाशिक जिल्ह्याने काम केलं. असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी येवला येथील जाहीर सभेत व्यक्त केलं.

आम्ही तुमच्यासोबत आहोत

शरद पवार म्हणाले, चुकीच्या काही गोष्टी झाल्या असतील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेसवरही आरोप केले. ते आरोप भ्रष्टाचाराचे होते. तुमच्या हातात देशाची सत्ता आहे. या सत्तेचा वापर करून चौकशी करा. दोषींना शिक्षा करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असंही शरद पवार म्हणाले.

तुमची माफी मागणं माझं कर्तव्य

येवला येथील सभेत बोलताना शरद पवार म्हणाले, आज मी या‌ ठिकाणी माफी मागायला आलो. माझा अंदाज चुकत नाही. पण इथं चुकला. त्यामुळं तुम्हाला ‌यातना झाल्या. माझं कर्तव्य तुमची माफी मागणं आहे.

वयाच्या भानगडीत पडू नका

शरद पवार म्हणाले, काही लोकं म्हणतात, तुमचं वय झालंय. वय झालं हे खरं आहे. पण, निवृत्त व्हा. असं म्हणू नका. वयाच्या भानगडीत पडू नका. गडी काय हे पाहिलचं नाही. काय टीका करायची ‌ती करा. पण वय आणि व्यक्तिगत टीका करू नका, असंही शरद पवार यांनी सुनावलं.

काय करायचं ते लोकं ठरवतील

छगन भुजबळ यांना संधी दिली. पण, ते सोडून गेले. त्यातून माणसाचं कॅरेक्टर कळतं. माझं असेसमेंट चुकलं यात मी दुसऱ्याला दोष देत नाही. जे आमच्यापासून बाजूला गेले त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. कारण काय करायचं ते लोकं ठरवतील.

Follow Us
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?