Sharad Pawar | शरद पवार यांनी भाषणात येवल्याच्या नागरिकांची माफी मागितली, पाहा नेमकं काय म्हणाले

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज येवला दौऱ्यावर आहेत. शरद पवारांची आज येवल्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेत त्यांनी येवल्याच्या नागरिकांची जाहीर माफी मागितली.

Sharad Pawar | शरद पवार यांनी भाषणात येवल्याच्या नागरिकांची माफी मागितली, पाहा नेमकं काय म्हणाले
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 6:45 PM

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज येवला दौऱ्यावर आहेत. शरद पवारांची आज येवल्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी शरद पवार यांनी येवल्याच्या नागरिकांची जाहीरपणे माफी मागितली. “आज मी या ठिकाणी टीका करायला नाही तर माफी मागण्यासाठी आलो आहे. मी माफी यासाठी मागतोय कारण माझा अंदाज कधी फारसा चुकत नाही. पण इथे माझा अंदाज चुकला. माझा अंदाज चुकला”, असं शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले. शरद पवार यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील चॅलेंज दिलं आहे. शरद पवार यांनी आज खूप कमी शब्दांत म्हणणं मांडलं. यावेळी त्यांनी येवल्याच्या नागरिकांना भावनिक साद घातली.

शरद पवार नेमकं काय-काय म्हणाले?

“सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण करायचं. ही भूमिका घेऊन राजकारण करण्याचा विचार आम्ही सगळ्यांनी केला. आम्ही सगळ्यांनी एका मोठ्या नेत्याचं मार्गदर्शन घेतलं. या मतदारसंघाचा इतिहास हा मोठा आहे. स्वातंत्र्याच्या संघर्षामध्ये परकियांच्या विरुद्ध लढण्यासाठी तात्या टोपेंनी ऐतिहासिक काम केलं. त्यांची ही भूमी आहे. या भूमीतील लोकांवर अडचणी असतील, संकटे असतील, दुष्काळ असेल, पण ते स्वाभिमान कधी सोडणार नाहीत. या स्वाभिमानी लोकांना पुन्हा शक्ती देण्याची गरज आहे. त्यासाठी आज आम्हा लोकांना अधिक जबाबदारी घ्यावी लागेल”, असं शरद पवार म्हणाले.

“एक काळ असा होता की त्या काळात चुकीच्या काही गोष्टी घडल्या असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. मध्यंतरी दहा-बारा दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. त्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर आरोप केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही आरोप केले”, असं पवार म्हणाले.

शरद पवार यांचं मोदींना चॅलेंज

“मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो, त्यांनी जे आरोप केले ते वेगवेगळ्या प्रकारचे असतील, त्या आरोपांमध्ये त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, माझं जाहीरपणे पंतप्रधानांना सांगणं आहे, आमच्यापैकी कुणी भ्रष्टाचारात सहभागी झाला असं तुम्हाला वाटत असेल तर तुमची असेल नसेल तेवढी सगळी सत्ता वापरा. तपास करा. सखोल चौकशी करा आणि ज्याने भ्रष्टाचार केलाय असं निष्पन्न झालं तर त्याला पाहिजे ती शिक्षा द्या. त्यासाठी आम्हा सगळ्यांचा तुम्हाला पाठिंबा राहील”,  असं चॅलेंज शरद पवारांनी दिलं.

“राजकारणात अनेक चढउतार आले. राजकारणात अनेक संकट येतात. पण अनेक संकटात लोकांनी माझी साथ सोडली नाही”, असंदेखील शरद पवार यावेळी म्हणाले.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.