AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालेगावच्या सभेतही 50 खोके, एकदम ओके; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा डिवचले

चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती दौऱ्यावर असतानाही त्यांनी मालेगावातील सभेवरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. मतांसाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडून दिल्याची टीकाही करण्यात आली होती

मालेगावच्या सभेतही 50 खोके, एकदम ओके; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा डिवचले
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Mar 26, 2023 | 7:22 PM
Share

मालेगाव : काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून पायउतार केले होते. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर ठाकरे गटाकडून वारंवार 50 खोके एकदम ओके असा आरोप सातत्याने लावण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या 50 खोके एकदम ओके या आरोपावर शिंदे गटाकडून उत्तर देण्यात आले आहे. मात्र आज मालेगावमध्ये होत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणीही 50 खोके एकदम ओके च्या घोषणांनी सभास्थळ दुमदूमून गेले होते.

मालेगावमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. त्यानिमित्ताने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीतही आज 50 खोके एकदम ओकेच्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होण्याआधीच 50 खोके एकदम ओके च्या घोषणा पुन्हा एकदा घुमल्याने शिंदे गटाच्या आमदारांना डिवचले गेले आहे.

मालेगावमधील सभास्थळावर उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी खाऊन खाऊन माजले बोके, 50 खोके एकमद ओके अशा आशयाचे खोके सभास्थळी झळकल्याने याची जोरदार चर्चाही सुरु झाली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मालेगावमधील सभेआधीच या सभेची चर्चाही जोरदार पणे करण्यात आली होती. या सभेआधी संजय राऊत यांनी शिवसेनेच्या गद्दारांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांना लगावला होता.

तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती दौऱ्यावर असतानाही त्यांनी मालेगावातील सभेवरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. मतांसाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडून दिल्याची टीकाही करण्यात आली होती

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा