AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Dark Sky Village : महाराष्ट्रातलं हे ठिकाण ठरणार देशातलं पहिलं ‘डार्क स्काय’ गाव.. नक्की काय घडणार ?

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील हे गाव भारतातील पहिलं 'डार्क स्काय कम्युनिटी' बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे खगोल पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात.

Maharashtra Dark Sky Village : महाराष्ट्रातलं हे ठिकाण ठरणार देशातलं पहिलं 'डार्क स्काय' गाव.. नक्की काय घडणार ?
Maharashtra Dark Sky Village
| Updated on: Sep 02, 2026 | 2:20 PM
Share

Maharashtra Dark Sky Village : महाराष्ट्रातील एक गाव पहिलं ‘डार्क स्काय कम्युनिटी’ बनण्याच्या तयारीत आहे. राज्यातील नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल उदमळ हे गाव आता रात्रीचे आकाश जपण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवत आहे. त्यामुळे या गावाला पहिलं ‘डार्क स्काय कम्युनिटी’ बनवण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहे. रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाश कमी करून आकाशातील तारे स्पष्टपणे दिसावेत आणि प्रकाश प्रदूषणाला आळा घालावा, हा या उपक्रमा मागचा मुख्य उद्देश आहे.

कोणी केली सुरूवात ?

या मोहिमेची सुरूवात गावातील 22 वर्षीय विपुल खराडी या विद्यार्थाने केली. मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी विपुलने रात्रीच्या वेळी आकाश निरीक्षण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने गावातील नागरिकांशी संवाद साधायचा प्रयत्न केला. आणि स्वच्छ आणि अंधारमय रात्रीचे आकाश केवळ निसर्गाचा सुंदर ठेवा नसून, त्यातून पर्यटन आणि रोजगाराच्या संधीही निर्माण होऊ शकतात, हे त्याने पटवून दिलं.

या योजनेसाठी किती निधी मंजूर ?

त्याच्या प्रयत्नांना हळूहळू गावकऱ्यांचाही पाठिंबा मिळू लागला. जिल्हा प्रशानसाची देखील आा या उपक्रमाला साथ मिळाली आहे. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा प्रशासनाने 42.14 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. हा निधी आदिवासी उपयोजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला. मंजूर करण्यात आलेल्या या निधीतून रात्रीच्या आकाशाच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यात येईल, तसेच प्रकाश प्रदूषणाबाबत जनजागृती मोहीम राबलवली जाईल. एवढंच नव्हे तर स्थानिक तरुणांना प्रशिक्षण देण्याचं काम केलं जाणार आहे. गावातील अनावश्यक कृत्रिम प्रकाश कमी करून पर्यावरणपूरक बाह्य प्रकाशव्यवस्था स्वीकारण्यावरही भर दिला जाणार आहे. यासंदर्भात ग्रामसभेने ठराव मंजूर केला.

11 ठिकाणांमध्ये उदमळचा समावेश

उदमळ हे राज्य सरकारने ‘इंटरनॅशनल डार्क स्काय प्लेस’चा दर्जा मिळवण्यासाठी निवडलेल्या 11 ठिकाणांपैकी एक आहे. या यादीत कास पठार, लोणार आणि तोरणमाळ यांसारख्या प्रसिद्ध ठिकाणांचाही समावेश आहे. उदमळमधील स्वच्छ आणि ताऱ्यांनी भरलेलं रात्रीचं आकाश हे पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल, अशी प्रशासनाला आशा आहे. त्यामुळे खगोल पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. उत्पन्नाचा नवा स्रोत मिळू शकतो. उदमलचे आकाश प्रकाश प्रदूषणापासून मुक्त राहिल्यास, हे गाव भविष्यात खगोल पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र बनण्याची शक्यता आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा