जितेंद्र आव्हाडांच्या लेकीने मागितली माफी; डिलमिटेशनवरून अचानक नेमकं काय घडलं?
डिलिमिटिशेनवरून राजकीय घडामोड वाढल्या आहेत. डिलिमिटेशनला विरोध दर्शवणाऱ्या आव्हाडांच्या लेकीची पोस्ट चर्चेत आली आहे. नताशा आव्हाड नेमकं काय म्हणाल्या, जाणून घ्या

भाजप सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक सादर करणार आहे. या विधयेकाला इंडिया आघाडीतील मतभेद उघड झाले आहे. एकीकडे डिलिमिटेशनला उघडपणे विरोध दर्शवला हे. तर दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशनवरून तळ्यात मळ्यात भूमिका घेताना दिसत आहे. त्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला पांठिबा देणार असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे पक्षातील खासदारांनी अद्याप निर्णय झाला नसल्याचे जाहीर केले आहे. या विधेयकाला जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विरोध केला होता. परंतु आव्हाडांच्या कालच्या भूमिकेने नताशा यांनी भूमिका बदलली का, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. या चर्चेदरम्यान, नताशा आव्हाड यांची यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भूमिका स्पष्ट केली. यावेळी सर्वांची मनापासून माफी देखील मागितली.
नताशा आव्हाड यांची पोस्ट जशीच्या तशी
नताशा आव्हाड म्हणाल्या, ‘कृपया माझ्या शांततेचा अर्थ माझी सहमती किंवा या गोष्टीतील सहभाग असा समजू नका. मला टॅग करणाऱ्या प्रत्येकाचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचलाय. मी तुमचं म्हणणे ऐकत आहे आणि तुमच्या भावना समजून घेतंय. त्याबद्दल मी मनापासून माफी मागते’. नताशा आव्हाड यांच्या भूमिकेपेक्षा पक्षाने वेगळी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता नताशा आव्हाड काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
नताशा आव्हाड काय म्हणाल्या होत्या?
जितेंद्र आव्हाड यांची लेक नताशा आव्हाड यांनी विधेयकावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. नताशा आव्हाड म्हणाल्या होत्या की, भाजप या मुद्द्याचा वापर एका मनमानी सीमांकन विधेयकाचं समर्थन करण्यासाठी करतंय. हा थेट लोकशाहीवर हल्ला आहे. या सीमांकन विधयेकासोबत महिला आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करे चुकीचे आणि दिशाभूल करणार आहे. महिला आरक्षण हे 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधीच मंजूर झालं होतं. ज्यामुळे भाजपला आगामी निवडणुकीत त्याची अंमलबजावणी करण्याची संधी देखील मिळाली होती’.