Treking : आई-वडिल सोबत असताना नेरळ किल्ल्यावरुन मुंबईचा डॉक्टर बेपत्ता, 3 दिवसांनी समजलं, सर्वच हळहळले

Treking : ठाणे जिल्ह्यातील वानगानी येथे शेवटच सेलफोन लोकेशन दाखवत होतं. पनवेलच्या बाजूने सातीची वाडी येथून डॉ.निखिल यांनी किल्ल्यात प्रवेश केला होता.

Treking : आई-वडिल सोबत असताना नेरळ किल्ल्यावरुन मुंबईचा डॉक्टर बेपत्ता,  3 दिवसांनी समजलं, सर्वच हळहळले
Dr Nikhil Tannir
| Updated on: May 20, 2023 | 2:51 PM

नवी मुंबई : नेरळ येथील किल्ल्यावरुन बेपत्ता झालेल्या कांदिवलीतल्या 24 वर्षीय डॉक्टरचा अखेर शोध लागला आहे. डॉ. निखिल तन्नीर असं डॉक्टरच नाव आहे. डॉ. निखिल तन्नीर ट्रेकिंगसाठी म्हणून नेरळच्या पेब किल्ल्यावर गेले होते. डॉ. निखिल हे पेशाने डेंटिस्ट होते. डॉ. निखिल हे रविवारी संध्याकाळी 4 वाजल्यापासून बेपत्ता होते. मोबाइल फोन लोकेशनमुळे पोलिसांना डॉ. निखिल तन्नीर यांचा शोध लागला. डॉ. निखिल तन्नीर एकटेच ट्रेकिंगसाठी गेले नव्हते. ट्रेकिंग टीम आणि कुटुंबीय सुद्धा सोबत होते.

निखिल यांचे वडिल किशोर (51) आणि आई सुनिता (47) हे सुद्धा सोबत होते. डॉ.निखिल ट्रेकिंग करताना पुढे होते. त्यांचे आई-वडिल मागे होते. वडिल किल्ला चढताना आईची मदत करत होते.

3 दिवसांनी शोध लागला

डॉ. निखिल तन्नीर यांचा 3 दिवसांनी शोध लागला. पण सर्वच हळहळले, किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांचा मृतदेह आढळला. डॉ. निखिल तन्नीर यांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. पोलिसांना त्यांच्या तपासात काही संशयास्पद आढळलेलं नाहीय. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

घटनास्थळी मोबाइल सापडला ?

मृतदेह ताब्यात घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मध्यरात्रीपर्यंत मृतदेह मिळेल, असं पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी सांगितलं. मोबाइल फोन लोकेशनवरुन पोलिसांनी डॉ. निखिल यांचा मृतदेह शोधून काढला. बचाव पथकाला घटनास्थळी त्यांचा मोबाइल सापडला नाही.

किल्ल्यात कुठून प्रवेश केलेला?

ठाणे जिल्ह्यातील वानगानी येथे शेवटच सेलफोन लोकेशन दाखवत होतं. पनवेलच्या बाजूने सातीची वाडी येथून डॉ.निखिल यांनी किल्ल्यात प्रवेश केला होता. त्याआधी ते पनवेलच्या कर्नाळा किल्ल्यावर ट्रेक करुन आले होते.

ट्रेकिंग करताना किल्ल्यावरुन खाली पडल्यामुळे डॉ. निखिल तन्नीर यांचा मृत्यू झाला. निखिल आणि त्यांचे वडिल यांचं मालाडमध्ये क्लिनिक आहे. पोलिसांनी मृतदेह शोधून काढण्यासाठी स्थानिक ट्रेकिंग टीम्सची मदत घेतली.