AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navi Mumbai | मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये भव्य आरोग्य आणि रक्तदान शिबीर संपन्न

आजच्या कार्यक्रमातून जवळपास 500 बाटल्यांचे संकलन करणारे असल्याचे आमदार शशिकांत शिंदे म्हणाले. तर तपासणी दरम्यान एखाद्या गंभीर आजार आढळून आल्यास त्याचा मोफत इलाज MGM रुग्णालयात केला जाणार असल्याचे सभापती अशोक डक यांनी सांगितले.

Navi Mumbai | मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये भव्य आरोग्य आणि रक्तदान शिबीर संपन्न
मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये भव्य आरोग्य आणि रक्तदान शिबीर संपन्न
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Dec 10, 2021 | 8:10 PM
Share

नवी मुंबई : सध्या देशावर ओमिक्रॉनचे संकट घोंगावत आहे. तर तिसऱ्या लाटेची चाहूल लागली असतानाच पुन्हा राज्यासह देशाला रक्ताचा तुटवडा भासणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद आणि सामाजिक जबाबदारी म्हणून मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये रक्तदान व आरोग्य शिबीराचे आयोजन केले गेले. मुंबई एपीएमसी मार्केट आणि एमजीएम हॉस्पिटल नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व आरोग्य शिबिर पार पडले. शिबिरात बाजार घटकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. तर रक्तदात्यांना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवसनिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. नेत्र आणि दंत चिकित्सेसह रक्तदाब आणि मधुमेह आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला. या शिबिराचे उद्घाटन आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडले.

तपासणी दरम्यान एखाद्या गंभीर आजार आढळून आल्यास मोफत इलाज

कोरोना काळात मोठ्या प्रमाणात रक्त तुटवडा भासला होता. त्यावेळी बाजार समितीने नवी मुंबईत सर्वात मोठे रक्तदान शिबीर भरून काही प्रमाणात तो तुटवडा भरून काढला होता. तसेच आता देखील रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने आजच्या कार्यक्रमातून जवळपास 500 बाटल्यांचे संकलन करणारे असल्याचे आमदार शशिकांत शिंदे म्हणाले. तर तपासणी दरम्यान एखाद्या गंभीर आजार आढळून आल्यास त्याचा मोफत इलाज MGM रुग्णालयात केला जाणार असल्याचे सभापती अशोक डक यांनी सांगितले.

या प्रसंगी आमदार शशिकांत शिंदे, सभापती अशोक डक, उपसभापती धनंजय वाडकर, मार्केट संचालक अशोक वाळुंज, निलेश वीरा, विजय भुत्ता, संजय पानसरे, शंकर पिंगळे, प्रविण देशमुख, महादेव जाधव, हुकूमचंद आमधरे, बाळासाहेब सोळस्कर, सचिव संदीप देशमुख तसेच सर्व बाजार घटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Massive Health and Blood Donation Camp at Mumbai APMC Market)

इतर बातम्या

Navi Mumbai Crime | मुंबई, नवी मुंबईसह राज्याबाहेर करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या बंटी बबलीला अटक

भरदिवसा सोने खरेदीदाराला लुटणारे टोळी जेरबंद; पनवेल गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!