भरदिवसा सोने खरेदीदाराला लुटणारे टोळी जेरबंद; पनवेल गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी

भरदिवसा सोने खरेदीदाराला लुटणारे टोळी जेरबंद; पनवेल गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी
भरदिवसा सोने खरेदीदाराला लुटणारे टोळी जेरबंद

अनिकेत जोमा म्हात्रे, कार्तिक सुशिल सिन्हा, किरण विजय पवार, भिमा रामराव पवार, मनोज गुरम्या राठोड, तसेच लक्ष्मण सुभाष राठोड उर्फ लकी उर्फ वाघ्या अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सुरेश दास

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Dec 10, 2021 | 7:20 PM

नवी मुंबई : कळंबोली येथे भरदिवसा सोने खरेदीदाराला लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. कळंबोली येथील मॅकडोनल्ड समोर पुणे- मुंबई मार्गावरील बस स्टॉपजवळ सोने खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून घातक शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून त्याच्याजवळील 19 लाख रुपये या चोरट्यांनी लुटले होते. यावर अपर पोलीस आयुक्त महेश घुर्ये यांनी तासाभरात घटनास्थळी पोहचून माहिती घेतली. पोलीस उप आयुक्त सुरेश मेंगडे यांनी घटनास्थळी भेट देवून उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी ‘साक्षिदारांकडे सखोल चौकशी केली. तसेच याबाबत विशेष पथक नेमण्यात आले होते.

अटक केलेल्या आरोपींकडून 22 लाख 54 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

या पथकाने विशेष मोहिम राबवत आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली. अनिकेत जोमा म्हात्रे, कार्तिक सुशिल सिन्हा, किरण विजय पवार, भिमा रामराव पवार, मनोज गुरम्या राठोड, तसेच लक्ष्मण सुभाष राठोड उर्फ लकी उर्फ वाघ्या अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच अटक आरोपींकडून गुन्हा करतेवेळी वापरलेली 3 घातक शस्त्रे, फिर्यादी यांची रक्कम ठेवलेली बॅग, गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने व लुटलेली संपूर्ण रक्कम अशी एकूण 22 लाख 54 हजार एवढ्या रकमेची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.

सदर व्यापारी आणि लुटीचा मास्टरमाईंड अनिकेत एकमेकांच्या परिचयाचे

बीडमधील अंबेजोगाई येथील सोन्याचे व्यापारी शुक्रवारी रात्री सोने खरेदी करण्यासाठी अंबेजोगाई येथून खाजगी ट्रॅव्हल्स बसने मुंबई येथे येत असत. लुटण्यात आलेले व्यापारी आणि अटक आरोपी अनिकेत म्हात्रे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. सदर व्यापारी प्रत्येक शनिवारी कळंबोली येथील मॅकडोनल्ड समोर सकाळी सातच्या सुमारास उतरुन अटक आरोपी अनिकेत म्हात्रे याच्या परिचयाच्या व्यक्तिकडे फ्रेश होण्यासाठी जात असत. त्यांनतर ते सोने खरेदी करून पुन्हा संध्याकाळी खाजगी ट्रॅव्हल्स बसने मूळगावी परत जात असत. ही संपूर्ण माहिती अटक आरोपी अनिकेत म्हात्रे याने त्याच्या इतर साथीदारांना देऊन दरोडा टाकून लुटण्याचा कट रचला.

गुन्हे शाखाचे सहायक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या नेतृत्वाखाली पनवेल गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण फडतरे, संदिप गायकवाड, पोलीस उप निरीक्षक वैभव रोंगे यांच्या पथकाने विशेष मोहिम राबवत मोठ्या शिताफीने आरोपींना अटक केले. (Navi Mumbai Police arrested a gang who robbed a gold buyer in Kalamboli)

इतर बातम्या

Pune Crime |पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई ; पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या 6 जणांना अटक

Kalyan Crime | ट्रेनमध्ये नवजात बाळाला सोडणाऱ्या महिलेसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें