Pune Crime |पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई ; पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या 6 जणांना अटक

Pune Crime |पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई ; पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या 6 जणांना अटक
संग्रहित छायाचित्र.

आळेफाटा येथे जालिंदर पटाडे यांच्या मालकीचे साई इलेक्ट्रॉनिक नावाचे दुकान आहे.या दुकानात 6 डिसेंबर 2021 रोजी , 6 अनोळखी इसम दुकानात घुसले. पिस्तुलाचा धाक दाखवत दुकानातील 21 हजाराची रोकड लंपास केली. त्याचवेळी त्यांनी जबरदस्तीने दुकानमालकाकडून वाहनाच्या चाव्याही काढून घेतलया होत्या.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Dec 10, 2021 | 6:52 PM

पुणे – जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, आळेफाटसहा अनेक ठिकाणी दरोडे खोरांनी उच्छाद मांडला आहे. मात्र अशातच एका दिलासा दायक माहितीसमोर आली आहे. काही दिवसांपूर्वी आळेफाटा येथे झालेल्या इलेक्ट्रॉनिक चोरीच्या घटनेतील आरोपीना पकडण्यात पोलिसांनी यश आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने अशी कारवाई केली आहे. कारवाईत पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपी नेवासा तालुक्यातील असून, सर्वजण 20 ते22 वयोगटातील असल्याची माहिती  पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी पुणे ग्रामीण पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

अशी घडली होती घटना

आळेफाटा येथे जालिंदर पटाडे यांच्या मालकीचे साई इलेक्ट्रॉनिक नावाचे दुकान आहे.या दुकानात 6 डिसेंबर 2021 रोजी , 6 अनोळखी इसम दुकानात घुसले. पिस्तुलाचा धाक दाखवत दुकानातील 21 हजाराची रोकड लंपास केली. त्याचवेळी त्यांनी जबरदस्तीने दुकानमालकाकडून वाहनाच्या चाव्याही काढून घेतलया होत्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली होती. नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली होती.

पतसंस्थेवर पडला होता दरोडा जुन्नर तालुक्यात मागील दोन आठवत भर दुपारी पतसंस्थेवर दरोडा घालण्यात आल्याची घटना घडली होती. यामध्ये दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पतसंस्थेतील व्यवस्थापकाला गोळी मारून हत्या केली. त्यानंतर पिस्तुलाचा धाक दाखवत दोन- तीन लाख रुपयांची रोकड चोरून   नेली होती.

कल्याणमध्ये शिवसेनेला खिंडार पडणार?, माजी आमदार भाजपच्या वाटेवर?; उलटसुलट चर्चांना उधाण

Uttar pradesh : योगींनी घेतली विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहानांच्या कुटुंबियांची भेट, योगींकडून मदत जाहीर

Omicron : मुंबईची धडधड वाढली, धारावीत एकजण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें