AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Crime | ट्रेनमध्ये नवजात बाळाला सोडणाऱ्या महिलेसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

या महिलेचे एका विवाहित पुरुषासोबत संबंध होते. त्या महिलेला त्याने घर घेऊन दिले होते. त्यांच्या दोघातील अनैतिक संबंधामुळे तिने बाळाला जन्म दिला. हे बाळ नकोसे झाल्याने तिने बाळाला रेल्वे ट्रेनमध्ये सोडले होते.

Kalyan Crime | ट्रेनमध्ये नवजात बाळाला सोडणाऱ्या महिलेसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ट्रेनमध्ये नवजात बाळाला सोडणाऱ्या महिलेसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
| Edited By: | Updated on: Dec 10, 2021 | 5:33 PM
Share

कल्याण : नवजात बाळाला ट्रेनमध्ये सोडून महिलेने पळ काढल्याची घटना टिटवाळा रेल्वे स्थानकात 20 नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. सदर महिला डोंबिवलीतील रहिवासी असून रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीच्या आधारे कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

सीसीटीव्हीच्या आधारे क्राईम ब्रांचने आरोपींना केली अटक

टिटवाळा रेल्वे स्थानकात 20 नोव्हेंबर रोजी ट्रेनमध्ये एका पिशवीत नवजात बाळ आढळून आले होते. कल्याण जीआरपीने या प्रकरणी भादवी 317 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास कल्याण जीआरपीसह कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचही तपास करीत होते. हा तपास करीत असताना क्राईम ब्रांचने सर्व स्थानकातील सीसीटीव्ही तपासले. कोपर रेल्वे स्थानकातून एक महिला स्थानकात बसली होती. तिच्या हाती एक पिशवी होती. ज्या पिशवीत ते बाळ सापडले, ती पिशवी आणि महिलेच्या हातातील पिशवी सारखीच दिसत होती. तिच महिला असावी अशी शक्यता पोलिसांना वाटली. याच शक्येतेच्या आधारे पोलिसांनी तपास केला. या महिलेचा पोलिसांनी पत्ता शोधून काढला. ही महिला डोंबिवलीच्या देवीच्या पाडा परिसरात राहणारी आहे.

अनैतिक संबंधातून बाळ जन्माला आल्याची माहिती

याबाबत कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे पोलीस अधिकारी अशरद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचे एका विवाहित पुरुषासोबत संबंध होते. त्या महिलेला त्याने घर घेऊन दिले होते. त्यांच्या दोघातील अनैतिक संबंधामुळे तिने बाळाला जन्म दिला. हे बाळ नकोसे झाल्याने तिने बाळाला रेल्वे ट्रेनमध्ये सोडले होते. यात तिच्या प्रियकराचाही समावेश होता. पोलिसांनी या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. (Police arrested a woman and her boyfriend who dropped off a newborn baby on a train)

इतर बातम्या

Nagpur Crime | मकरधोकडा शिवारात आढळली मानवी कवटी, हाडे; हे कुणाचे अवयव असणार?

Madhya Pradesh Crime: घरगुती वादातून दिराकडून वहिनीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.