AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhya Pradesh Crime: घरगुती वादातून दिराकडून वहिनीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या

मुलांना वाचवण्यासाठी मंजुलताही मागे धावली. विनय पळून जाण्यात यशस्वी झाला. पण मंजुलता खाली पडली. यानंतर राजू आणि त्याचा मुलगा राधाशरण तिच्यावर तुटून पडले आणि कुऱ्हाडीने वार केले. तिला सोडवण्यासाठी आलेला दुसरा मुलगा गिरराज याच्यावरही आरोपींनी हल्ला केला.

Madhya Pradesh Crime: घरगुती वादातून दिराकडून वहिनीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 10, 2021 | 4:14 PM
Share

शिवपुरी : घरगुती वादातून दिराने आपल्या विधवा वहिनीवर कुऱ्हाडीने वार करुन तिची निर्घृण हत्या केल्याची घटना मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात घडली आहे. एवढेच नाही तर आरोपी दिराने आपल्या पुतण्यांवरही हल्ला केला असून यात एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंजुलता असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर राजू भार्गव असे आरोपीचे नाव असून त्याने आपल्या मुलाच्या मदतीने ही हत्या केली.

चबुतरा बनवण्यावरुन झाला वाद

शिवपुरी जिल्ह्यातील पिचोर विभागातील भोंटी शहरात भार्गव कुटुंबीय वास्तवास आहे. मंजुलताच्या पतीचे निधन झाले आहे. आरोपी राजू भार्गव हा मंजुलताच्या घराजवळ बसण्यासाठी दगडी चबुतरा बनवत होता. याला मंजुलताचा विरोध होता. यावरुन अनेक दिवसापासून मंजुलता आणि तिचा दिर राजू भार्गव यांच्यात भांडण सुरु होते. मंजुलताचा मोठा मुलगा विनय याने चबुतरा थोडा दूर बांध असे विनयला सांगितले. दरम्यान, राजूचा मुलगा राधाशरण भार्गवही तेथे आला. भांडण इतके वाढले की, आरोपी राजू व त्याचा मुलगा राधाशरण यांनी कुऱ्हाड घेऊन विनयवर वार केले.

मुलांना वाचवताना गेली असता मंजुलताची हत्या

राजू आणि त्याच्या मुलाच्या हल्ल्यातून जीव वाचण्यासाठी विनय आणि त्याच्या इतर भावंडांनी जीव मुठीत धरून पळ काढला, पण आरोपींनी हार मानली नाही. मुलांना वाचवण्यासाठी मंजुलताही मागे धावली. विनय पळून जाण्यात यशस्वी झाला. पण मंजुलता खाली पडली. यानंतर राजू आणि त्याचा मुलगा राधाशरण तिच्यावर तुटून पडले आणि कुऱ्हाडीने वार केले. तिला सोडवण्यासाठी आलेला दुसरा मुलगा गिरराज याच्यावरही आरोपींनी हल्ला केला. आरोपींनी कुऱ्हाडीने वार मंजुलता हिचा खून केला. तर गिरराज गंभीर जखमी झाला. गंभीर स्थितीत त्याला ग्वाल्हेरला रेफर करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. (Murder of sister-in-law by brother-in-law in a domestic dispute)

इतर बातम्या

Vinod Kambli | माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला ऑनलाईन गंडा, KYC च्या नावे 1.14 लाखांची लूट

Pimpri-chinchawad crime |शहरात पिस्तुल परवान्यांसाठी ‘भाऊ’ , ‘दादा’, ‘मामांची चढाओढ

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.