Supriya Sule : ‘अजित पवार मेला त्याने मला फरक पडला नाही’, किशोर मासाळच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Supriya Sule : राजकारणात कोणी कोणाचा नसतो हे म्हणतात ते खोटं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच एका नगरसेवकाने अजित पवारांबद्दल खूप चुकीचं स्टेटमेंट केलं आहे. किशोर मासाळ या नगरसेवकाच्या वक्तव्याचा सर्वत्र निषेध होत आहे.

Supriya Sule :  अजित पवार मेला त्याने मला फरक पडला नाही, किशोर मासाळच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
Kishore Masal-Ajit Pawar
| Updated on: Jun 08, 2026 | 2:57 PM

बारामतीतील नगरसेवक किशोर मासाळ याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. हयात असताना अजितदादांनी ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, तो हा नगरसवेक आहे. अजित पवार यांच्या पक्षाचा हा नगरसेवक आहे. अजित पवार या किशोर मासाळच भरभरुन कौतुक करायचे. अजित पवार यांच्या आवडत्या लोकांच्या यादीत तो होता. पण तोच किशोर मासाळ आता अजित पवारांबद्दल जे बोलला, त्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. अजित पवार मेला त्याने मला फरक पडला नाही, असे या नगरसेवकाचे शब्द आहेत. एका महिलेबरोबर बोलतानाचा किशोर मासाळची क्लिप व्हायरल झाली आहे. राजकारणात लोक किती कृतघ्न असतात, त्याचं हे उत्तम उदहारण आहे.

हा किशोर मासाळ ज्या महिलेबरोबर बोलतोय त्यात बिअर पिण्याचा सुद्धा उल्लेख आहे. रुपाली ताई मेली पाहिजे, अजित पवार मेला त्याने मला फरक पडला नाही असं हा मासाळ म्हणतो. त्याचवेळी फोनवर बोलणारी महिला म्हणते मी मेली तरी तुला फरक पडणार नाही, त्यावर तो नाही फरक पडणार असं बोलतो.

अजित पवारांबद्दल चुकीचं वक्तव्य

ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर किशोर मासाळला आपल्या बोलण्याता पश्चाताप झाला आहे. “चार दिवसांपूर्वी माझी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यात मी अजित पवारांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं. मी अजित पवारांचे कुटुंबिय आणि समस्त बारामतीकरांची माफी मागतो. मी जे बोललो त्याचा पश्चाताप म्हणून अजित पवारांचा अपघात झाला, त्या ठिकाणी एकदिवसाच अन्न त्याग आत्मक्लेष आंदोलन करणार आहे” असं या मासाळने जाहीर केलय.

अत्यंत खालच्या पातळीचं, दुर्देवी वक्तव्य

“मासाळने केलेलं वक्तव्य तो विषय दुर्देवी आणि गलिच्छ आहे. आत्मक्लेष करणार असं ते म्हणतातय. अत्यंत खालच्या पातळीचं, दुर्देवी, दु:ख देणारं ते वक्तव्य आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील म्हणाले की, “जी ऑडिओ क्लिप आहे, दादा गेल्याने मला फरक पडत नाही. यात एक तर दोन गोष्टी आहेत. ती ऑडिओ क्लिप खरी की खोटी याची तपासणी केली पाहिजे. ती जर खरी असेल तर महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की, कोणीही कितीही चिथावण्याचा प्रयत्न केला, तरी आपल्या तोंडून दादांविषयी असे अपशब्द निघणं योग्य नाही”

Follow Us