AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेच्या वाटेवर, कार्यकर्त्यांसोबत चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले दिलीप सोपल शिवसेनेत गेल्यास सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असेल.

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेच्या वाटेवर, कार्यकर्त्यांसोबत चर्चा
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Aug 17, 2019 | 4:49 PM
Share

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती सुरुच आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार दिलीप सोपल (NCP MLA Dilip Sopal) शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार असल्याचं त्यांनी (NCP MLA Dilip Sopal) स्पष्ट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले दिलीप सोपल शिवसेनेत गेल्यास सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असेल.

दिलीप सोपल यांनी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला दांडी मारून बार्शीत आपल्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेतलाय. आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना आपण समजावून घेणार असून आठ दिवसात आपण आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सोपल यांनी सांगितलंय.

गेल्या काही दिवसांपासून आमदार दिलीप सोपल (NCP MLA Dilip Sopal) शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. आधी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला आमदार दिलीप सोपल यांनी दांडी मारली होती. त्यात आता मुंबईच्या बैठकीला दांडी मारून आपल्या समर्थक कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेतला. त्यामुळे आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे संकेत आहेत.

दिलीप सोपल यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार राजा राऊत हे शिवसेनेतून भाजपमध्ये गेल्याने दिलीप सोपल (NCP MLA Dilip Sopal) यांचा मार्ग मोकळा झालाय. भाजपा-शिवसेना युतीच्या जागावाटपानुसार बार्शी विधानसभेची जागा शिवसेनेकडे येते. त्यामुळे आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेचे शिवबंधन लवकरच हातात बांधण्याची शक्यता आहे. निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून मी कार्यकर्त्यांची भावना समजून घेईल आणि लवकरच कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे जाहीर करणार असल्याचं दिलीप सोपल यांनी म्हटलंय.

दिलीप सोपल कोण आहेत?

दिलीप सोपल बार्शी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात.

आघाडी सरकारमध्ये विविध मंत्रालयांची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

दिलीप सोपल पहिल्यांदा 1985 मध्ये आमदार झाले, तेव्हापासून 2014 पर्यंत पाच वेळा ते निवडून आले आहेत. 2004 मध्ये त्यांचा पराभव झाला होता.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क ही जमेची बाजू

अजित पवारांशी मैत्रीचे संबंध, शरद पवारांशी काँग्रेसच्या काळापासून एकनिष्ठ नेता अशी त्यांची ओळख आहे.

राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य म्हणून ओळख

Follow Us
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...