AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्याचे चिरंजीव भाजपच्या गळाला?

अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेचे आमदार वैभव पिचड (MLA Vaibhav Pichad) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वैभव पिचड (MLA Vaibhav Pichad) हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय.

राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्याचे चिरंजीव भाजपच्या गळाला?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 25, 2019 | 7:27 AM
Share

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरु झाल्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार भाजपच्या गळाला लागल्याचं बोललं जातंय. अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेचे आमदार वैभव पिचड (MLA Vaibhav Pichad) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वैभव पिचड (MLA Vaibhav Pichad) हे लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासोबत वैभव पिचड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

वैभव पिचड यांचे वडील मधुकर पिचड हे अनेक वर्ष मंत्री होते. राज्याच्या आदिवासी मंत्रालयाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. विशेष म्हणजे मुधकर पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. अनेकदा त्यांना मंत्रिपदही मिळालं होतं.

राष्ट्रवादीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या मधुकर पिचड यांचाच मुलगा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता आहे.

वैभव पिचड यांची मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीवर प्रतिक्रिया कळू शकली नाही. पण वैभव पिचड हे शिवसेना किंवा भाजपात जाणार असल्याच्या चर्चा त्यांच्या मतदारसंघातही गेल्या अनेक दिवसांपासून होत आहेत.

मधुकर पिचड यांनी अकोल्यातून मुलाला उमेदवारी दिली होती. वैभव पिचड सध्या बंदीस्त कालव्यांसाठी आंदोलन करत आहेत. निळवंडेच्या कालव्यांना वैभव पिचड यांचा विरोध आहे.

उघड्या कालव्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं, असं त्यांचं म्हणणं आहे. या आंदोलनांसाठी मतदारसंघात सक्रिय असणारे वैभव पिचड आता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उत गेलाय.

दरम्यान, गेल्या काही महिन्यात राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केलाय. शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य असलेले जयदत्त क्षीरसागर यांनीही लोकसभा निवडणुकीनंतर शिवबंधन बांधलं होतं. आणखी अनेक आमदार भाजपात येणार असल्याचा दावा शिवसेना आणि भाजपकडून कायम केला जातोय.

Follow Us
राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
Water Level In Dams : पुढील 9 महिने पाण्याची चिंता वाढणार? राज्यातील धरणांमध्ये सरासरी किती टक्के पाणी साठा शिल्लक?
इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे...
Sanjay Raut : इंडिया ब्लॉक-मविआच्या भवितव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य; शरद पवार हे....
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
SC Reservation : निर्णय झाला, पण अंमलबजावणी कुठे? अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईत दाखल
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
S. Chockalingam : मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचं ECIला पत्र; काय आहेत मागण्या?
बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
Shweta Mahale : बुलढाण्याचा बिहार झालाय, पुन्हा...; श्वेता महालेंचा विरोधकांवर हल्लाबोल
4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार?; भायखळा ते....
Thackeray Brothers : 4 ऑक्टोबरच्या महामोर्चाचा मार्ग आज ठरणार? राज-उद्धव ठाकरे 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार; भायखळा ते...
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा