AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाराजी नाट्यानंतर छगन भुजबळ-अजित पवार पहिल्यांदाच येणार आमनेसामने, कुठे, कधी? पाहा सर्व डिटेल्स

छगन भुजबळ हे आजपासून दोन दिवस होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे नाराजी नाट्यानंतर आज पहिल्यांदा छगन भुजबळ आणि अजित पवार हे आमने- सामने येणार असल्याचे बोललं जात आहे.

नाराजी नाट्यानंतर छगन भुजबळ-अजित पवार पहिल्यांदाच येणार आमनेसामने, कुठे, कधी? पाहा सर्व डिटेल्स
छगन भुजबळ, अजित पवार
| Updated on: Jan 18, 2025 | 9:36 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यानंतर गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे लवकरच मोठा निर्णय घेतील, अशी चर्चा रंगली होती. यानंतर मोठे नाराजी नाट्यही पाहायला मिळाले. मात्र आता ओबीसी नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. माजी मंत्री छगन भुजबळ हे आजपासून दोन दिवस होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे नाराजी नाट्यानंतर आज पहिल्यांदा छगन भुजबळ आणि अजित पवार हे आमने- सामने येणार असल्याचे बोललं जात आहे.

राष्ट्रवादीचे नवसंकल्प अधिवेशन

आगामी महापालिका, नगरपरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच नेते तयारीला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन शिर्डीत पार पडले. त्यानतंर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आजपासून दोन दिवस नवसंकल्प अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. शिर्डीत हे अधिवेशन पार पडणार आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते ध्वजारोहण करून या अधिवेशनाची सुरूवात होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत या अधिवेशनात विचारमंथन केले जाणार आहे.

मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी

राष्ट्रवादीचे नवसंकल्प अधिवेशन ज्या ठिकाणी होणार आहे त्या अधिवेशनाच्या ठिकाणास यशवंतराव चव्हाण नगरी म्हणून संबोधित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीचे मंत्री, आजी माजी आमदार, खासदार आणि महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत ठिकठिकाणी बँनर आणि पक्षाचे झेंडे पाहायला मिळत आहेत.

छगन भुजबळ यांची नाराजी दूर?

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नवसंकल्प अधिवेशनला नाराज असलेले छगन भुजबळ हजर राहणार आहेत. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या विनंतीवरुन आज ते शिबिराला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. या शिबिरासाठी शिर्डीमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर नाराज असलेले नेते छगन भुजबळ यांचा फोटो लावण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनामुळे नागपुरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. त्या बॅनरवर अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे फोटो होते. पण आता शिबिराला या बॅनरवर छगन भुजबळ यांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांची नाराजी दूर होणार का? हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

धनंजय मुंडेंही राहणार उपस्थित?

छगन भुजबळ हे प्रकृती अस्वस्थामुळे शिबिराला उपस्थित राहणार नव्हते, असे सांगण्यात आले होते. मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा विनंतीला मान देऊन छगन भुजबळ शिबिराला हजेरी लावणार आहेत. यावेळी अधिवेशनात छगन भुजबळ देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आज सकाळी १० वाजता छगन भुजबळ हे अधिवेशनासाठी पोहोचतील असे बोललं जात आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे हे देखील या राष्ट्रवादीच्या नवसंकल्प अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी १२ वाजेपर्यंत धनंजय मुंडे हे अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक साई मंदिराचे दर्शन घेतले. नव संकल्प शिबिर सुरू होण्यापूर्वी अजित पवार यांनी साई दर्शनाला हजेरी लावली. दरम्यान भाजपानंतर राष्ट्रवादी शिर्डीतून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे बोललं जात आहे. कुठल्याही कामाची सुरूवात आपण देवाच्या दर्शनाने करत असतो, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार