AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neet Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, डॉक्टरला उचललं, मोटेगावकरांशी थेट कनेक्शन, सीबीआयला काय सापडलं?

नीट पेपरफुटी प्रकरणाचा सीबीआय तपास वेगाने सुरू आहे. या देशभरात खळबळ माजवणाऱ्या प्रकरणात आता पुण्यातून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे

Neet Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, डॉक्टरला उचललं, मोटेगावकरांशी थेट कनेक्शन, सीबीआयला काय सापडलं?
Neet Paper Leak Case
| Updated on: May 21, 2026 | 8:45 AM
Share

देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात (Neet Paper Leak) एक मोठी अपडेट समोर आली आहे. या केसचा सीबीआयकडून तपास सुरू असतानाच एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सीबीाआयने पुण्यातून आणखी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. डॉक्टर मनोज शिरुरे असं त्याचं नाव आहे, बालरोगतज्ज्ञ असलेल्या शिरूरेने स्वतःच्या मुलासाठी शिवराज मोटेगावकरकडून (Shivraj Motegaonkar) पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यामुळे सीबीआयने त्याला अटक केली आहे.

नीट पेपरफुटीचं प्रकरण समोर येताच देशभरातील लाखो विद्यार्थ्यांची मेहनत आणि स्वप्नांचा चुराडा झाला. यामुळे देशभरात प्रचंड खळबळ माजली.महाराष्ट्रात याची पाळमुळं पसरल्याचे समोर येताच सीबीआयने कसून कारवाई करत आत्तापर्यंत अनेकांना अटक केली आहे. याच प्रकरणाच्या तपासादरम्यान मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिका तसेच संशयास्पद माहिती आढळल्यानंतर सीबीआयने पुण्यात संशयिता विद्यार्थ्यांच्या घरांवर धाड टाकली होती. याच दरम्यान, काल रात्री उशीरा लातूरमध्येही कारवाई करण्यात आली, त्यामध्ये डॉ. शिरुरे याला बेड्या ठोकण्यात आल्या. प्राथमिक तपासात डॉ. शिरुरे हे शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे.  याप्रकरणाला आता गडद वळण लागलं आहे.

मुलासाठी पेपर खरेदी केल्याचा आरोप

डॉ. शिरुरे हा लातूरमधील असून तो बालरोगतज्ज्ञ असल्याची माहिती समोर आली आहे. मनोज शिरुरे याने स्वतःच्या मुलासाठी पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू असताना सीबीआयने मनोज शिरुरे याला चौकशीसाठी लातूर येथून पुण्यला आणलं होतं. त्याची कसून चौकशी करण्यात आली, त्यानंतर काल रात्री मनोज शिरुरेला सीबीआयने अटक केली. याप्रकरणात एखाद्या विद्यार्थ्याच्या पालकाला झालेली अटक अशी ही आत्तपार्यंतची पहिलीच कारवाई आहे. त्यामुळे नीट पेपरफुटी प्रकरण आणखी गंभीर होताना दिसत आहे.

डॉ. शिरुरे याने नेमका कोणाकडून पेपर विकत घेतला आणि तो पुढे कोणाला दिला होता का ? याचा तपासही सीबीआयकडून करण्यात येणार आहे. मंगळवारपासूनच सीबीायकडून डॉ. शिरूरे याची चौकशी सुरू होती, अखेर त्याला काल रात्री अटक करण्यात आली. आता त्याला पुढील तपासासाठी दिल्लीत नेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ