AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET : विद्यार्थी आणि पालकही जाळ्यात? आरोपींची आर्थिक कोंडी? सीबीआयचा फास आवळला

NEET Exam 2026 Paper Leak: सध्या देशभरात नीट पेपर फुटीचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणी सीबीआयने आता ज्या विद्यार्थ्यांनी लिक झालेला पेपर घेतला त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

NEET : विद्यार्थी आणि पालकही जाळ्यात? आरोपींची आर्थिक कोंडी? सीबीआयचा फास आवळला
NEETImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 21, 2026 | 8:01 AM
Share

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता अधिक तीव्र झाला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारांना गजाआड केल्यानंतर, आता आपला मोर्चा या गैरव्यवहाराचा थेट फायदा घेणाऱ्या लाभार्थी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडे वळवला आहे. लातूर येथील शिक्षण सम्राट मोटेगावकर याच्या अटकेनंतर या तपासाला मोठी गती मिळाली असून, आता ‘सीबीआय’सह ‘ईडी’नेही (Enforcement Directorate) आरोपींची आर्थिक कोंडी करण्याची तयारी सुरू केली आहे.

विद्यार्थी आणि पालकांची कसून चौकशी सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयचे एक विशेष पथक सध्या पुण्यात तळ ठोकून आहे. अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपींच्या चौकशीतून ज्या लाभार्थी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची नावे समोर आली आहेत, त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी पाचारण केले जात आहे. पुण्यात दररोज या विद्यार्थी आणि पालकांची कसून चौकशी केली जात असून, पेपरसाठी किती पैशांची देवाणघेवाण झाली? आणि हा व्यवहार कोणामार्फत झाला? याचा शोध सीबीआय घेत आहे. केवळ पेपर फोडणारेच नाही, तर त्याचा बेकायदेशीर लाभ घेणारेही तितकेच दोषी असल्याने आता विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे धाबे दणाणले आहेत.

ईडी आणि सीबीआय ॲक्शन मोडमध्ये

नीट पेपरफुटी प्रकरणाला आता आर्थिक गुन्हेगारीचे मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. या घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा संशय असल्याने सीबीआय आणि ईडीने संयुक्तपणे आरोपींच्या संपत्तीची चौकशी सुरू केली आहे. महाराष्ट्रातून आतापर्यंत या प्रकरणात तीनहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी पेपर विकून अवैध मार्गाने कमावलेल्या पैशातून कुठे मालमत्ता गोळा केली आहे का, याचा तपास केला जात आहे.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून मागवली माहिती

आरोपींची मालमत्ता जप्त करण्याच्या उद्देशाने सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयात ठाण मांडले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर राज्यात कुठे आणि किती स्थावर मालमत्ता (जमीन, फ्लॅट, व्यावसायिक गाळे) आहे, याची अधिकृत माहिती सीबीआयकडून गोळा केली जात आहे. ही माहिती हाती आल्यानंतर संबंधित मालमत्तांवर टाच आणली जाण्याची दाट शक्यता आहे.

गैरव्यवहाराचे मूळ

शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या आणि हुशार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या रॅकेटचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तपास यंत्रणांनी कंबर कसली आहे. मुख्य आरोपींची आर्थिक नाकेबंदी करण्यासोबतच, पैशांच्या जोरावर डॉक्टर बनू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या पालकांचे बुरखे फाडण्याचे काम आता सीबीआयने सुरू केले आहे. आगामी दिवसांत या चौकशीतून आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...