AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET Paper Leak : नीट पेपर फुटीचा मास्टरमाईंट पी. व्ही. कुलकर्णीला मोठ झटका, बीडमध्ये आता..

नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार पी.व्ही. कुलकर्णीच्या बीड येथील शाहूनगरमधील अवैध बांधकामावर नगरपरिषदेने कठोर कारवाई सुरू केली आहे. तपासणीत कोणतीही परवानगी नसताना, नियमबाह्य बांधकाम केल्याचे उघड झाले. यामुळे सर्व संबंधित धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, लवकरच तोडक कारवाई केली जाणार आहे. नगरपरिषदेने अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे.

NEET Paper Leak : नीट पेपर फुटीचा मास्टरमाईंट पी. व्ही. कुलकर्णीला मोठ झटका, बीडमध्ये आता..
पी.व्ही. कुलकर्णीला मोठा झटका
| Updated on: May 20, 2026 | 2:45 PM
Share

नीट पेपरफुटी (NEET Exam Paper Leak) प्रकरणामुळे देशभरात तर खळबळ उडालीच पण लाखो विद्यार्थ्यांची मेहनत, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. याप्रकरणाचा तपास सुरू असून सीबीआयच्या तपासात अनेक धागेदोर समोर येत आहेत. याच पेपर फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार अर्थात मास्टरमाईंड पी.व्ही कुलकर्णी याला सीबीआयने पुण्यातून अटक केली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) अतिशय गोपनीय अशा प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीशी कुलकर्णी हा संबंधित होता, अशी माहिती समोर आली. त्याच्या अटकेने प्रचंड खळबळ माजली.

आता याच पी.व्ही. कुलकर्णीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सध्या तुरूंगाच्या गजाआड असलेल्या पी.व्ही कुलकर्णी याचे बीड शहरातील शाहूनगर भागात इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र त्याचं बांधकाम विनापरवाना असल्याचं उघड झालं असून आता त्यावर तोडक कारवाई होणार आहे. नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

विनापरवाना बांधकाम, तोडक कारवाई होणार

बीड शहरामध्ये शाहूनगर भागात एक अनधिकृत बांधकाम, विनापरवानगी बांधकाम सुरू आहे. आणि ते नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार पी.व्ही कुलकर्णी याचे इमारतीचे बांधकाम आहे. मात्र यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर नगरपरिषदेच्या नगररचना कार्यालय आणि मालमत्ता कर विभागाने पाहणी केली तसेच चौकशीही करण्यात आली. तेव्हा त्या ठिकाणी गंभीर त्रुटी आणि अनियमितता आढळून आली आहे. त्या बांधकामाची परवानगीची संचिका आम्ही तपासली, मात्र कुलकर्णी याच्या बांधकामासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच चारही बाजूने नियमानुसार सोडल्या जाणाऱ्या जागेतही बांधकाम करण्यात आलं आहे. यामुळे या बांधकामाशी संबंधित सर्व होल्डर्सना नोटीसा बजावून पुढील कारवाई केली जाणार आहे. तसेच तोडक कारवाई देखील केली जाणार आहे, अशी माहिती नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश फडसे यांनी दिली आहे.

त्यामुळे कुलकर्णी याच्या अडचणी चांगल्याच वाढल्या असून ते बांधकाम लवकरच पाडलं जाणार असून त्याच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

कोण आहे पी.व्ही. कुलकर्णी ?

2026 च्या नीट पेपरफुटीमध्ये महाराष्ट्र मॉड्यूलने अत्यंत महत्त्वाची आणि मोठी भूमिका बजावली. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी हे अनेक वर्षांपासून नीटचे पेपर तयार करणाऱ्या ‘एनटीए’च्या राष्ट्रीय पॅनेलवर कार्यरत होते. त्यामुळे त्याच्याकडे वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र (Zoology) विषयांच्या प्रश्नपत्रिका पूर्णपणे उपलब्ध होत्या. पी.व्ही. कुलकर्णी पुण्यात विद्यार्थ्यांसाठी घरगुती शिकवणी वर्ग चालवायचा. या वर्गांमध्ये तो विद्यार्थ्यांना संभाव्य प्रश्न (Guess Paper) म्हणून प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्न वहीत लिहून घ्यायला सांगायचे. या रॅकेटमध्ये पी. व्ही. कुलकर्णी याने मनीषा वाघमारे हिच्याशी हातमिळवणी केली होती अशी माहिती समोर आली. कुलकर्णी हा सध्या सीबीआय कोठडीत आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा