AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टेलिग्रामचा ग्रुप, आलोक गुरु अन् तब्बल…; नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयला आतापर्यंत काय काय सापडलं?

नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणातील 'महाराष्ट्र कनेक्शन' समोर आले असून, सीबीआयने पुण्यातून डॉ. मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतले आहे. नागपूरचा मुख्य सूत्रधार 'आलोक गुरू' आणि लातूरचे शिवराज मोटेगावकर यांचे कोचिंग नेटवर्क सीबीआयच्या रडारवर आहे.

टेलिग्रामचा ग्रुप, आलोक गुरु अन् तब्बल…; नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयला आतापर्यंत काय काय सापडलं?
NEET UG 2026 Paper leak
| Updated on: May 22, 2026 | 7:53 AM
Share

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट-यूजी २०२६ (NEET-UG 2026) पेपरफुटी प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन आता एका धक्कादायक वळणावर पोहोचले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाकडून याप्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. आता या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी वेगाने पावले उचलली जात असून नागपूर मॉड्यूल, हाय-प्रोफाईल कोचिंग नेटवर्क आणि कोट्यवधींच्या व्यवहारांचे धागेदोरे हाती लागले आहेत. याच तपासाचा भाग म्हणून सीबीआयने पुण्यातून डॉ. मनोज शिरुरे या वैद्यकीय व्यावसायिकाला ताब्यात घेतले असून, लातूरमध्येही मोठी छापेमारी केली आहे.

पुण्यातून डॉक्टर ताब्यात; लातूरमध्ये ३ तास चौकशी

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातून ताब्यात घेण्यात आलेल्या डॉ. मनोज शिरुरे यांच्यावर नीटचा फुटलेला पेपर विकत घेतल्याचा गंभीर आरोप आहे. बुधवारी सकाळी सीबीआयच्या एका विशेष पथकाने लातूरमधील डॉ. शिरुरे यांच्या रुग्णालयावर अचानक छापा टाकला. येथे त्यांची तब्बल तीन तास कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे वैद्यकीय आणि शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

प्रश्नपत्रिका देणारा आलोक गुरु कोण?

विदर्भातील या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार म्हणून नागपूरचा आलोक नावाचा संशयित समोर आला आहे. तो या नेटवर्कमध्ये आलोक गुरू या टोपणनावाने सक्रिय होता. सीबीआयच्या पथकांनी सध्या नागपूर आणि चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी भागात तळ ठोकला आहे. ब्रह्मपुरीमधून यावर्षी नीट परीक्षा दिलेल्या तीन विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली आहे. या तपासात समोर आले आहे की आरोपींनी गुरू नावाचा एक गुप्त टेलिग्राम ग्रुप तयार केला होता. या ग्रुपच्या माध्यमातून प्रश्नपत्रिकेच्या पीडीएफ (PDF) फाईल्स शेअर केल्या जात होत्या.

त्यातच आता नीट पेपरफुटीचे रॅकेट कसे चालायचे याची माहिती समोर आली आहे. यात प्रत्येकी १० विद्यार्थ्यांचे लहान गट (Groups) पाडले जायचे. प्रति विद्यार्थी १० ते १५ लाख रुपये उकळले जायचे. तसेच नागपूर, चंद्रपूर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमधील श्रीमंत कुटुंबांतील विद्यार्थ्यांना टार्गेट केले जायचे.

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पेपरफुटीचा फायदा घेतलेल्या विद्यार्थ्यांचा आकडा तब्बल १,००० च्या आसपास असण्याची शक्यता आहे. आलोकच्या या गुरू नेटवर्कमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक नामांकित कोचिंग क्लासेसचे चालक, वैद्यकीय महाविद्यालयांचे कर्मचारी आणि विद्यार्थी एजंट्स सामील आहेत. सीबीआयने नागपूर आणि चंद्रपूरमधील ६ संशयित विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत.

पुण्याहून राजस्थान; आंतरराज्य धागेदोरे

या रॅकेटचे जाळे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून आंतरराज्य स्तरावर पसरले आहे. पुण्यातून लीक झालेली प्रश्नपत्रिका गुरुग्राम (हरियाणा) मार्गे थेट राजस्थानपर्यंत पोहोचवल्याचे तपासात उघड झाले आहे. या देशव्यापी साखळीत आणखी किती राज्यांचा समावेश आहे, याचा शोध सीबीआय घेत आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ