AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neha Bora CJP Protest Delhi : दिल्ली पोलिसांचं संताप आणणारं कृत्य; नेहा बोराला पकडताना पोलिसाचा लाजीरवाणा स्पर्श? व्हिडिओ व्हायरल

Neha Bora CJP Protest Delhi : दिल्ली पोलिसांचं संताप आणणारं कृत्य समोर आलं आहे. पुरुष पोलिसाने नेहा बोरा हिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Neha Bora CJP Protest Delhi : दिल्ली पोलिसांचं संताप आणणारं कृत्य; नेहा बोराला पकडताना पोलिसाचा लाजीरवाणा स्पर्श? व्हिडिओ व्हायरल
neha boraImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 11, 2026 | 9:16 AM
Share

Neha Bora CJP Protest Delhi: केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कथित मतचोरीच्या आरोपावरून देशभरात वातावरण तापलं आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात आधीच विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आता आयोगाच्या विरोधात सीजेपी, डाव्या संघटना देखील उतरल्या आहेत. सीजेपीने काल दिल्लीत आंदोलनाची हाक दिली. त्यानंतर दिल्ली पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली आहे. त्यानंतरही कार्यकर्त्यांकडून जंतरमंतरवर कूच केली जात आहे. दिल्लीत आंदोलनासाठी डाव्या विद्यार्थी संघटनेच्या नेहा बोरा हिनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. दिल्लीत आंदोलनस्थळी जाताना नेहाला एका पुरुष पोलिसाने अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु पुरुष पोलिसाच्या लाजीरवाण्या स्पर्शाने नेहाचा एकच संताप अनावर झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सीजेपीने आंदोलनाची घोषणा केल्यानंतर दिल्ली पोलिसांचा 25 हजारांचा फौटफाटा तैनात करण्यात आला होता. त्यानंतर सीजेपीसह डाव्या  संघटनांनी जोरदार आंदोलन केलं. परंतु पोलिसांच्या कारवाईपुढे आंदोलकांचा निभाव लागला नाही. आता दिल्ली पोलिसांच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. दिल्ली पोलिसांनी आंदोलक तरुणींना चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे.

डाव्या विचारांची AISA ची राष्ट्रीय अध्यक्ष नेहा बोरा हिला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं. परंतु तिला ताब्यात घेताना केलेल्या कारवाईवर टीका होऊ लागली आहे. दिल्ली पोलिसांनी नेहा बोरा हिच्यासोबत लाजीरवाणे कृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेहा बोरा आणि तिचे सहकारी पोलिसांना चकवा देत पळत होते. त्यावेळी नेहाला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याचा हात तिच्या छातीला लागला.  पोलिसाच्या कृत्याने नेहा बोरा चांगलीच भडकली. यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श झाल्याची जाणीव झाली. त्यानंतर या पोलिसाने ताबडतोब हात जोडून माफी मागितली. महिला आंदोलकांना पुरुष पोलिसांना हात लावता येत नाही, असा नियम आहे. त्यानंतरही दिल्लीत पोलिसांकडून नियमाचा भंग होताना दिसत आहे.

Follow Us
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल