AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोटात दुखू लागल्याने मुलीला हॉस्पिटलमध्ये नेले अन् समोर आलेलं सत्य ऐकून डॉक्टरही सुन्न; डोंबिवलीत काय घडलं?

डोंबिवलीच्या निळजे परिसरात १७ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची सविस्तर बातमी. आरोपी सोहम पाटील विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पीडिता ५ आठवड्यांची गर्भवती आहे.

पोटात दुखू लागल्याने मुलीला हॉस्पिटलमध्ये नेले अन् समोर आलेलं सत्य ऐकून डॉक्टरही सुन्न; डोंबिवलीत काय घडलं?
crime
| Updated on: Apr 05, 2026 | 12:08 PM
Share

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली जवळील निळजे परिसरात एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून मी तुझा नवरा आहे असे भासवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या नराधमाच्या कृत्यामुळे पीडित मुलगी दीड महिन्यांची गर्भवती राहिली आहे. सध्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सोहम पाटील याने संबंधित अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिला लग्नाचे खोटे आश्वासन दिले होते. मी तुझ्याशीच लग्न करणार आहे, मी तुझा पती आहे, असे शब्द देऊन त्याने मुलीला मानसिक जाळ्यात ओढले. पीडितेच्या अज्ञानाचा आणि अल्पवयीन असण्याचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्या राहत्या घरीच तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हे अत्याचार एकदाच थांबले नाहीत तर लग्नाचे आमिष दाखवून त्याने वेळोवेळी पीडितेचे लैंगिक शोषण केले.

अत्याचाराचा पाढा वाचला

गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलीची प्रकृती खालावली होती. तिला शारीरिक त्रास होऊ लागल्याने पालकांनी काळजीपोटी तिला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत जी बाब समोर आली, ती ऐकून पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. पीडित मुलगी ५ ते ६ आठवड्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, सोहम पाटील याने केलेल्या अत्याचाराचा पाढा तिने वाचला.

यानंतर पीडितेच्या आईने याप्रकरणी तातडीने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपी सोहम पाटील याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी इन्व्हेस्टिगेशन व्हॅन बोलावली असून, वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यासाठी पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

नराधमांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी

सध्या पीडित मुलगी सध्या मानसिक धक्क्याखाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मानपाडा पोलीस आरोपी सोहम पाटीलचा शोध घेत असून, त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी कायदेशीर प्रक्रियेला वेग आला आहे. या घटनेमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच समाजात अशा नराधमांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

Follow Us
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....