AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Karale : कराळे मास्तर पदवीधर निवडणूक लढणार, वेळ पडली तर बंडखोरीही करणार

Nitesh Karale News : सोशल मीडियावर 'कराळे मास्तर' म्हणून लोकप्रिय असलेले नितेश कराळे पुन्हा एकदा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

Nitesh Karale : कराळे मास्तर पदवीधर निवडणूक लढणार, वेळ पडली तर बंडखोरीही करणार
Nagpur Graduate ElectionImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 27, 2026 | 7:16 PM
Share

पदवीधर मतदारसंघांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. उमेदवारांकडूनदेखील तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. त्यातच आता कराळे मास्तर म्हणून सोशल मीडियावर लोकप्रिय असलेले नितेश कराळे हेही निवडणुकीत उतरणार आहेत. त्यांनी यावेळी टीव्ह9 मराठीशी बातचीत करताना त्यांचा निवडणुकीबद्दलचं मत सांगितलं आहे. ते म्हणाले की मी मागच्यावेळीसुद्धा होतो. तेव्हा मी तिसऱ्या क्रमांकावर होतो. साडेआठहजार लोकांनी मला मतदान केलं होतं. तेव्हा तर मी व्हायरल होऊन काहीच दिवस झाले होते. पण मला विदर्भ-नागपुरातून चांगला प्रतिसाद दिला. कोणतंही संघटन नसताना मला एवढं मतदान पडलं होतं. तर यावेळीही मी प्रबळ दावेदार आहे, असं कराळे मास्तर म्हणाले आहेत. पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी विधानपरिषदेत जाण्याची इच्छा असल्याचे यावेळी कराळे मास्तरांनी सांगितले आहे. या जागा खास राखीव असतात, पण हे आमदार कधी विद्यार्थ्यांचे प्रश्नच मांडत नाहीत.

पार्टीची 28 सप्टेंबर रोजी बैठक आहे. त्यामध्ये मी तिकीट मागणार आहे. मी आतापर्यंत अनेक सभा, अनेक कार्यक्रमांमध्ये पक्षासाठी काम केलं आहे. पक्षाच्या अनेक लोकांना निवडून आणण्यात मी खारीचा का असेना वाटा उचलला आहे. मला त्याचं योगदान मिळावं. तिकीट दिलं नाही तर मग आपण अपक्ष जिंदाबाद आहेच, असंही यावेळी कराळेंनी सांगितलं आहे.

लोकसभेला मी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेसला फायदा झाला. यावेळी आपल्याला न्याय मिळावा, पक्षाने सकारात्मक विचार करावा अशी भूमिका त्यांनी मांडली. आता सगळे पोरं म्हणत आहेत, सर तुम्ही यावेळी उभा रहा. तुम्ही दिल्लीला गेलात. सीजेपीच्या आंदोलनामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांसाठी भूमिका मांडली. स्वतःवर केसेस घेता. त्यामुळे तुम्ही उभे राहिले पाहिजे, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडल्याचं त्यांनी सांगितलं.

झिरो बजेट निवडणूक लढण्याचा मानस असल्याचीही माहिती त्यांनी दिली. माझ्यासाठी विद्यार्थीही खर्च करायला तयार आहेत. जास्तीत जास्त 25 लाख रुपये खर्च करुन ही निवडणूक लढू सांगताना त्यांनी तिकीट नाही दिलं तर पक्षाला (राष्ट्रवादी शप) थेट बंडखोरीचा इशाराही दिला आहे.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान