900 कोटींच्या जमिनीच्या बेकायदेशीर व्यवहाराच्या राऊतांच्या आरोपावर नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले, त्यांचं तोंड काळं करण्यासाठी
900 कोटींच्या जमिनीच्या बेकायदेशीर व्यवहाराच्या राऊतांच्या आरोपावर नितेश राणेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी बेकायदेशीर व्यवहराचे आरोप फेटाळून लावले आहे.

संजय राऊत यांनी कोकणातील एका मंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. 900 कोटींची जमीन धनिकांना बेकायदेशीर मार्गाने विकण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या आरोपाने राजकारण पेटलं आहे. संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या मंत्री नितेश राणे यांच्यावर आरोप केल्याचे बोलले जात आहे. संजय राऊत यांच्या आरोपानंतर मंत्री नितीश राणे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी प्रत्त्युत्तर देताना आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी राणेंनी संजय राऊत यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका करावी लागेल.
नितेश राणे म्हणाले, ‘ कोणी चुकीचं केलं नाही. आधी अहवाल येऊ द्या. त्या दिवशी संजय राऊतांचं तोंड काळं करण्यासाठी कुठेना कुठे शोधावे लागेल. राजकारण हे संकटाच्या काळात करू नये. कोणीतरी जीआर बसून वाचला पाहिजे. शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने जीआर काढण्यात आला आहे. ट्रिगर एक मधील तालुके असेल, अन्य वंचित तालुक्यांना मदत मिळणार आहे. आता होळी करण्यापेक्षा या शेतकरी, मच्छीमारांची दिवाळी गोड कशी होईल, यासाठी राजकीय पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले, 80 टक्के समाजकारण तर 20 टक्के समाजकारण…पण उद्धव ठाकरेंची सेना ही 100 टक्के राजकारणच करते’.
राऊतांचा आरोप काय?
‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात 900 कोटींची जमीन आहे. या जिल्ह्यातील वेंगुर्ला, सावंतवाडी, दोड मार्ग या भागातील 900 कोटींची शेत जमीन ही बंगळुरू, दिल्ली आणि हैदराबादच्या धनिकांना बेकरायदेशीरपणे विकल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शेतकरी नसलेल्यांना ही जमीन विकल्याचा आरोप राऊत यांनी केला. या व्यवहाराची चौकशी महसूल खात्यातकडून केली जात आहे. जमिनीसाठी महाराष्ट्रात 900 कोटींचा व्यवहार झाला आहे. महाराष्ट्रात तुकडे बंदी कायदा आहे. त्यानंतरही तीन तालुक्यातील जमीन विकायला काढली आहे. मंत्रिमंडळातील कोकणातील सिंधुदुर्गातील ते काय करातात? ते सगळ्या प्रकरणात परप्रांतीयांचा पार्टनर बनून व्यवहार करत आहेत. 900 कोटींच्या व्यवसाहाराठी जंगलतोड सुरू आहे. मी स्थानिक शिवसैनिकांसह तिथे जाणार आहे, असा आरोप देखील राऊत यांनी केली.
