AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करा आदळ-आपट झुकत नसतो बापट… पुण्यात डीजे प्रकरणात राडा..

डीजेविरोधाचा चेहरा का बनले..त्याचं उत्तर 24 ऑगस्टला पुणे महापालिकेत झालेल्या बैठकीत दडलंय... गणेशोत्सवाच्या तोंडावर पालिकेतहरकतींची बैठक सुरु होती., तेव्हा बापटांनी पहिल्यांदा डीजेविरोधाचा मुद्दा मांडला..

करा आदळ-आपट झुकत नसतो बापट... पुण्यात डीजे प्रकरणात राडा..
DJ pune
| Updated on: Sep 03, 2026 | 7:54 PM
Share

एक सर्वसामान्य पुणेकरानं सुरु केलेल्या डीजेविरोधातल्या लढ्यानं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघतोय…तर्कशुद्ध युक्तीवाद हल्ली महाराष्ट्रात शेवटची घटका मोजत असताना बापट मुद्देसूदपणे डीजेचा विरोध करतायत… ते निशस्र असले तरी त्यांचे मुद्दे, शब्द आणि संदर्भांच्या तलवारीनं डिजेसमर्थक शब्दबंबाळ झालेत…सरतेशेवटी विचार संपल्यानंतर विकार जडत असल्यानं बुद्धीपूर्ण युक्तीवादाच्या खेळात मनगटखोर पैलवाल उतरलेत… परिणामी अशाच एका संतोष चव्हाण नावाचा भ्याड हल्लेखोर मुद्द्याऐवजी गुद्द्यावर उतरला.. मात्र, 15 दिवसांपूर्वी लाखो पुणेकरांसारखे सर्वसामान्य असलेले विद्यानंद बापट महाराष्ट्रात कसे पोहोचले…डीजेविरोधाचा चेहरा का बनले..त्याचं उत्तर 24 ऑगस्टला पुणे महापालिकेत झालेल्या बैठकीत दडलंय… गणेशोत्सवाच्या तोंडावर पालिकेतहरकतींची बैठक सुरु होती., तेव्हा बापटांनी पहिल्यांदा डीजेविरोधाचा मुद्दा मांडला..

ते ऐकताच भाजपचे काही नगरसेवकांनी गदारोळ सुरु केला…सभागृहातला आवाज दाबला गेल्यानंतर बापट माध्यमांसमोर आले आणि त्यांच्या बिनतोड युक्तीवादानं डीजेच्या गंभीर प्रश्नाला खरोखर वाचा फुटली…भीतीपोटी जे लोक डीजेविरोधात ब्र शब्द काढत नव्हते., ते लोक खुलेपणानं बोलायला लागली… एरव्ही जशा प्रत्येक राजकीय मुद्द्याच्या चिंध्या-चिंध्या करुन मूळ मुद्द्याचा मुर्दा पाडला जातो.

तसाच प्रकार यावेळीही काही डीजे समर्थक आणि पुण्यातील कथित नेत्यांनी करण्याचा प्रयत्न केला…मात्र गणिताच्या पेपरला इंगज्रीची प्रश्नपत्रिका यावी.,तसे बापट डीजेसमर्थकांच्या वाट्याला आल्यानं अनेकांची भंबेरी उडाली… डीजे म्हणजे धर्म आणि कर्णकर्कश आवाज म्हणजे गणेशोत्सव इतकाच आवाका असलेल्यांच्या मेंदूला बापटांच्या युक्तीवादानं भोवळ येवू लागली…

37 वर्षीय बापट अविवाहित आहेत कॉर्मसमधून पदवी घेतलीय. पुण्यातल्या नारायण पेठेत त्यांचं छोटसं घर आहे. सध्या बीपीओ क्षेत्रात ते काम करतात…काही डीजे समर्थकांनी इयत्ता पहिलीपासून ते हयातीपर्यंत ऐकलेही नसतील., . इतकं प्रचंड शब्दभांडार बापटांकडे आहे.. फक्त शब्दांचाच भडिमार नसून बापटांकडे त्यासाठी तर्काचीही जोड आहे. स्वतःच्या मुद्द्याच्या समर्थनात ते पुण्याच्या नारायण पेठेपासून ते नेदरलँडपर्यंतचे संदर्भ देतात…आणि मुळात सण-उत्सव आहेत कशासाठी.

ते जातायत कोणत्या दिशेला., यावर त्यांचा मुख्य भर आहे….इंग्रजीपासून ते संस्कृतपर्यंत, पुराणकाळापासून मध्ययुगीन भारतापर्यंत आणि पुण्यातल्या पेठांपासून ते ब्रह्मांडात आतापर्यंत शोधल्या गेलेल्या आकाशमालांपर्यत… बापटांचं वाचन दांडगं आहे.. पण हा व्यासंग स्वतःपुरताच ठेवून कुजवण्यापेक्षा त्याचा जनजागृतीसाठी कामी यावा हा विवेकही बापटांकडे आहे., म्हणूनच 15 दिवसांपूर्वी सर्वसामान्य चेहरेपट्टीचा पुणेकर असलेल्या एका व्यक्तीचे मुद्दे राज्यात अनेकांना पटले…

बापट मूळचे रत्नागिरीतले आहेत., प्रत्येक मध्यमवर्गीयाचं असतं तसंच रत्नागिरीतल्या एका गावात त्यांचं छोटं घर आहे. आई-वडिल पुण्याहून गावी राहायला गेलेत. हल्ल्यांच्या बातमीनं आई-वडिल चिंतीत झाले असले तरी मुलासह त्यांच्या मुद्द्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे आहेत. टिळकांनी गणेशोत्सव हा लोकांना एकत्र करण्यासाठी सुरु केला….साध्य आणि साधन गणेशोत्सव असला तरी त्याचा मुख्य हेतू परकीय सत्तेविरोधात एकजुटीचा होता…

आज अनेक डीजेसमर्थक मंडळी गणपती आणि डीजे यापैकी साध्य आणि साधन कुणाला मानतात., हा प्रश्न त्यांनी स्वतःला करायला हवा… आज जर टिळक असते तर ते कुणाच्या बाजूनं उभे राहिले असते..याचं उत्तर त्यांना मिळेल…एकजुटीचा हा सोहळा फक्त डीजे नावाच्या कर्णकर्कश यंत्रामुळे फुटीचं कारण ठरतोय..आणि ज्या महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास हा तत्वज्ञानाच्या पंडितांना तर्कतीर्थाची उपाधी देण्याचा राहिलाय, त्याच महाराष्ट्रात तर्कावर बोलणाऱ्यांना मारहाण केली जातेय…

Follow Us
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी
तब्बल 3,182 क्युसेकने सोडणार पाणी; महाराष्ट्रातील कोयना धरणात मोठा...
तब्बल 3,182 क्युसेकने सोडणार पाणी; महाराष्ट्रातील कोयना धरणात मोठा विसर्ग
सरकारी पैशांतून राजकीय अजेंडा राबवला जातोय, बड्या नेत्याचा गंभीर आरोप
सरकारी पैशांतून राजकीय अजेंडा राबवला जातोय, बड्या नेत्याचा गंभीर आरोप
नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला अभिजीत दीपके यांची भेट
नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला अभिजीत दीपके यांची भेट
थेट रस्त्यावर आंधोळ करून निषेध; नवी मुंबईतील नागरिकांचे अजब आंदोलन
थेट रस्त्यावर आंधोळ करून निषेध; नवी मुंबईतील नागरिकांचे अजब आंदोलन
पुण्यातील गणेशोत्सवातील साऊंड सिस्टीम वाद: मंडळांची भूमिका
पुण्यातील गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण वाद: मंडळांची भूमिका आणि बापटांच्या भूमिकेवरील प्रश्नचिन्ह
विद्यानंद बापट: लाऊडस्पीकरवरील वाद, पुण्यातील ध्वनिप्रदूषणावर हल्लाबोल
विद्यानंद बापट यांचा लाऊडस्पीकरविरोधात हल्लाबोल: