चार तरुणींनी ओढण्या एकत्रित करुन वाहून जाणाऱ्या मुलाला वाचवलं, बीडच्या पोरींचं सर्वत्र कौतुक

अंबाजोगाई येथील बुटेनाथ परिसरात तरुणींनी दाखविलेल्या धाडसाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. बुटेनाथ परिसरातील एका नदीच्या प्रवाहात एक मुलगा अडकून पडला होता. चार तरुणींनी त्यांच्या ओढण्या एकत्रित करून त्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. तब्बल अर्ध्या तासानंतर त्या मुलाला वाचविण्यात यश आले.

चार तरुणींनी ओढण्या एकत्रित करुन वाहून जाणाऱ्या मुलाला वाचवलं, बीडच्या पोरींचं सर्वत्र कौतुक
वाहून जाणाऱ्या मुलाला वाचविण्यात यश

बीड : अंबाजोगाई येथील बुटेनाथ परिसरात तरुणींनी दाखविलेल्या धाडसाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. बुटेनाथ परिसरातील एका नदीच्या प्रवाहात एक मुलगा अडकून पडला होता. चार तरुणींनी त्यांच्या ओढण्या एकत्रित करून त्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. तब्बल अर्ध्या तासानंतर त्या मुलाला वाचविण्यात यश आले.

अर्धा तास थरार

दीच्या प्रवाहात अडकून पडलेला मुलगा बराच वेळ आकांत करत होता. नेमक्याच त्या ठिकाणी काही तरुणी फिरण्यासाठी गेल्या होत्या. आणि मुलगा प्रवाहात अडकल्याचे दिसले. चार तरुणींनी त्यांच्या ओढण्या एकत्रित करून त्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. तब्बल अर्ध्या तासानंतर त्या मुलाला वाचविण्यात यश आले.

बीडच्या पोरींचं सर्वत्र कौतुक

यावेळी मुलाचे वडील आणि काका देखील घटनास्थळी पोहचले होते. तरुणींच्या या धाडसाचे जिल्हा भरात कौतुक होत असून त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. रेणुका सोळंके असं धाडसी तरुणीचे नाव आहे.

जीवनदान देणाऱ्या तरुणीची प्रतिक्रिया

आज मी अंबाजोगाई मधील नागनाथ बुटेनाथ येथे गेले होते.तेथे वाणा नदीला खुप पाणी होते.पाण्याचा प्रवाहपण खुप जास्त होता.अचानक एक मुलगा पाण्यात पडला व पाण्याच्या प्रवाहात वहात गेला. त्याने पुढे एका खडकाला घट्ट पकडले. मी व त्या मुलाच्या वडीलांनी व आणखी एका काकांनी त्याला बाहेर काढले. मी सर्वांना विनंती करते .की लहान मुलांना पाण्याकडे एकटे जाऊ देऊ नका. सतत त्यांच्या सोबत रहा. आम्ही सर्वजण जवळच आजुबाजुला असल्यामुळे आज अघटीत घटना टळली, अशी प्रतिक्रिया जीवनदान देणारी तरुणी रेणुका सोळंके हिने दिली.

राज्यात पुढचे 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय. उद्यापासून म्हणजेच 20 सप्टेंबरपासून पुढचे तीन ते चार दिवस विविध भागांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय.

राज्यात पुढचे चार ते पाच दिवस पावसाची शक्यता IMD ने वर्तवली आहे. स्मॉल ऑरेंज डायमंड, उत्तर-पश्चिम मध्यप्रदेश, पुर्व राजस्थान स्थित कमी दाबाचे क्षेत्र येत्या 24 तासात क्षीण होतंय. स्मॉल ऑरेंज डायमंड बंगालच्या उपसागरावरची सिस्टिम पुढच्या 12 तासात ओरिसाकडे सरकेल व पुढच्या 2,3 दिवसात पश्चिम- उत्तर पश्मिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे, अशी माहिती के एस होसाळीकर यांनी दिलीय.

प्रादेशिक हवामान विभाग केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात 20 आणि 21 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वीजेच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. यापैकी 20 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 21 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि बीडमध्येही तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ही माहिती, डॉ. के.के . डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्याकडून मिळाली आहे.

(4 young women rescued a child who was swept away in a stream of water)

हे ही वाचा :

‘त्या’ घोरपडींच्या अवयवांचा काळ्या जादूसाठी वापर?; तिघे जेरबंद; कल्याण वनविभागाचा तपास सुरू

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI