AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ घोरपडींच्या अवयवांचा काळ्या जादूसाठी वापर?; तिघे जेरबंद; कल्याण वनविभागाचा तपास सुरू

कल्याणमध्ये वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. एका महिला वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्यूरो आणि कल्याणच्या वन विभागाच्या शाखेने छापा टाकला. (Forest officials seize black coral, animal parts from Kalyan resident)

'त्या' घोरपडींच्या अवयवांचा काळ्या जादूसाठी वापर?; तिघे जेरबंद; कल्याण वनविभागाचा तपास सुरू
Forest officials
| Edited By: | Updated on: Sep 19, 2021 | 11:02 AM
Share

कल्याण: कल्याणमध्ये वन विभागाने मोठी कारवाई केली आहे. एका महिला वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्यूरो आणि कल्याणच्या वन विभागाच्या शाखेने छापा टाकला. या धाडीत 250 इंद्रजाल (काळा समुद्री शैवाळ) आणि 80 जोडी घोरपडींचे अवयव जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी वन विभागाकडून वास्तू सल्लागार गीता जाखोटिया आणि तिच्या कार्यालयातील कर्मचारी नवनाथ घुगे आणि अक्षय देशमुख अशा तिघांना अटक केली आहे. या वस्तू इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यालयात का आणल्या? काळ्या जादूसाठी तर याचा वापर केला जात नव्हता ना? याचा तपास सुरु असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (Forest officials seize black coral, animal parts from Kalyan resident)

कल्याण पश्चिमेकडील संतोषी माता रोडवरील मॅक्सी ग्राउंडसमोरील इमारतीत असलेल्या गीता जाखोटिया यांचं कार्यालय आहे. दुर्मिळ व बाळगण्यास बंदी असलेल्या काळ्या समुद्र शैवाळाचे तुकडे व घोरपडीचे अवयव जाखोटिया यांच्या कार्यालयात असल्याची माहिती वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरोला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरो विभागीय उपसंचालक योगेश वारकड, गजेंद्र हिरे आणि वन विभागाचे आर एन चन्ने यांचा पथकाने गुरुवारी सायंकाळी धाड टाकली. यावेळी जाखोटिया यांच्या कार्यालयात 250 काळ्या समुद्र शैवाळाचे तुकडे आणि 80 जोड्या घोरपडीचे अवयव आढळून आले. या पथकाने मुद्देमालासह तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

चौकशी सुरू

या वस्तूचा साठा करण्यास किंवा या वस्तू जवळ बाळगण्यास कायद्याने बंदी असतानाही इतक्या मोठय प्रमाणावर या वस्तूचा साठा का करण्यात आला होता. हा साठा का करण्यात आला? यामागे कारण काय होते? याची विक्री करण्यात येणार होती का? यापूर्वीही त्यांनी असे कृत्य केले होते का? याची चौकशी सुरू असल्याचे वनविभागाचे अधिकारी चन्ने यांनी सांगितले. दरम्यान इंद्रजाल आणि घोरपडीचे अवयव घरात, कार्यालयात, दुकानात ठेवल्यास सुखशांती आरोग्य आणि लक्ष्मी घरात नांदते या अंधश्रद्धेपोटी या वस्तू बाळगल्या जातात. काळी जादू करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. तर आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील या वस्तू वापरल्या जातात. मात्र या वस्तू जवळ बाळगण्यास किंवा त्यांची विक्री करण्यास वन्यजीव कायदा 1972 अन्वये मज्जाव करण्यात आलेला आहे. (Forest officials seize black coral, animal parts from Kalyan resident)

संबंधित बातम्या:

जबाबदार नागरीक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून सदाचार आणि शिष्टाचाराच्या कथा रुजवाव्यात : राज्यपाल

VIDEO : अंगातलं भूत काढण्याच्या नावाखाली महिलेला अमानुष मारहाण, अखेर भोंदू बाबावर गुन्हा दाखल

भिवंडीत घराचा स्लॅब कोसळला, विरारमध्ये मीटर बॉक्समध्ये आग, तर कल्याणमध्ये गांजा जप्त

(Forest officials seize black coral, animal parts from Kalyan resident)

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.