अवघी सहा वर्षीय मुलगी बनली सोशल मीडिया स्टार, चिमुकलीचे भन्नाट व्हिडीओ व्हायरल

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील एका छोट्या मुलीचे भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. (Buldana Kadambari Dhamal Social Media Star Video Viral)

अवघी सहा वर्षीय मुलगी बनली सोशल मीडिया स्टार, चिमुकलीचे भन्नाट व्हिडीओ व्हायरल
Kadambari Dhamal

बुलडाणा : सध्या कोरोनाचा काळ जरी असला तरीही शेगावच्या कादंबरी ढमाळ या सहा वर्षीय चिमुकलीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या चिमुकलीचे महापुरूषांचा इतिहास उलगडणारे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहेत. त्यासोबतच कादंबरीचे जोक्स, डान्स, लावण्या, डायलॉगचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे शेगावची कादंबरी ही काही दिवसातच सोशल मीडिया स्टार झाली आहे. (Buldana Kadambari Dhamal Social Media Star Video Viral)

बुलडाणाच्या शेगावमधील छोट्या मुलीचे व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडीओ हे नेहमीच चर्चेचा विषय असतात प्रत्येकाला मुलांचा खोडकरपणा, त्यांचे लाडात बोलणे यांसारख्या असंख्य कारणामुळे त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील एका छोट्या मुलीचे भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.

वडिलांकडे व्हिडीओ बनवण्याचा हट्ट

बुलडाणा जिल्ह्याच्या प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगाव या ठिकाणी सहा वर्षीय चिमुकली कादंबरी ढमाळ राहते. ती सध्या के.जी मध्ये शिकते आहे. काही दिवसांपूर्वी मोबाईलमध्ये इंस्टाग्रामवर श्रद्धा शिंदे यांचे व्हिडीओ बघत असताना ते तिला प्रचंड आवडले. त्यानंतर तिनेही वडिलांकडे अशाचप्रकारे व्हिडीओ बनवण्याचा हट्ट केला. तेव्हापासून कादंबरीने व्हिडीओ बनवायला सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kadambari Dhamal (@kadambaridhamal)

कांदबरीचा व्हिडीओ व्हायरल

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे वर्णन करणाऱ्या अभिनय संपन्न व्हिडीओमुळे ती घरा-घरात पोहचली. विशेष म्हणजे शिवमुद्रा तोंडपाठ असल्याने तिचे कौतुक होते. नुकतंच अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कांदबरीने तयार केलेला व्हिडीओ चांगलाच गाजत आहे. सध्याच्या काळात लहान मुलांना टीव्ही, मोबाईलचे व्यसन जडले असताना या चिमुकलीला महापुरूषांच्या विचारांवर आधारित अभिनय करावासा वाटणे, हे नक्कीच गौरवास्पद म्हणावे लागेल.

कादंबरीला महापुरुषांच्या शौर्याचे वर्णन करण्यासोबतच लावण्या, डान्स, जोक्स, डायलॉगही तोंडपाठ आहेत. तर कादंबरीने मुलींना व्हिडीओच्या माध्यमातून केलेले आवाहनही फार गाजत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kadambari Dhamal (@kadambaridhamal)

शिक्षणाबरोबरच इतिहासाचे धडेही

इतकचं नव्हे तर शेगावचा ढमाळ परिवारही पुरोगामी विचारांचा असल्याने त्यांनी लहानपणापासूनच कांदबरीवर चांगले संस्कार केले आहेत. घरातून प्रोत्साहन मिळत असल्याने आपल्या अभिनय कौशल्यातून कादंबरी अभिनय क्षेत्रात चांगली कामगिरी करेल, असा विश्वास तिच्या घरातल्यांना वाटत आहे. त्यामुळे शिक्षणाबरोबरच इतिहासाचे धडेही तिला देण्यात येत आहेत. कादंबरीच्या या कामगिरीवर देशभरातून विशेष म्हणजे नामवंत मराठी कलावंत, गायक, क्रिकेटपटू, समीक्षक इत्यादींनीही तिचे व्यक्तिशः कौतुक केलं आहे. (Buldana Kadambari Dhamal Social Media Star Video Viral)

संबंधित बातम्या : 

PHOTO | ‘बाण हायकर्स’चा स्तुत्य उपक्रम, भिवपुरीच्या जंगलात ट्रेकर्स ग्रुपने राबवली वृक्षारोपण मोहीम!

Video : ‘पोलिसांपासून ते कलेक्टरपर्यंत हप्ते द्यावे लागतात’ मंत्री बच्चू कडूंनी केलेल्या स्टिंग ऑपरेशद्वारे धक्कादायक वास्तव उजेडात!

फार्म हाऊसवर दरोडा, लाखोंची चोरी, एकाची हत्या, पैसे ठेवणारेच निघाले चोर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI