गेल्या चार वर्षांपासून भिवपुरी येथील जंगलामध्ये 'बाण हायकर्स' (Baan Hikers) तर्फे वृक्षारोपण केले जाते. यावर्षी या मोहिमेअंतर्गंत 200 झाडांचे रोपण ‘बाण’च्या सदस्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने केले.
गेल्या चार वर्षांपासून भिवपुरी येथील जंगलामध्ये 'बाण हायकर्स' (Baan Hikers) तर्फे वृक्षारोपण केले जाते. यावर्षी या मोहिमेअंतर्गंत 200 झाडांचे रोपण ‘बाण’च्या सदस्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने केले.
1 / 6
या मोहिमेत बाण हायकर्सचे 30 सदस्य सहभागी झाले होते. भिवपुरी येथील माळरानावर पाच फुटांची रोपे आणण्याचे मोठे आव्हान होते. हे आव्हान गावातील तरुण मंडळींच्या सहभागातून पेलणे शक्य झाले.
2 / 6
भिवपुरीच्या या माळरानावर कडुलिंब, पिंपळ, गुलमोहर, सीसम, कांचन, कदंब, अशोक, अर्जुन, जांभूळ, आंबा इत्यादी झाडे लावण्यात आली. भविष्यात या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी देखील ‘बाण हायकर्स’ने घेतली आहे.
3 / 6
यामध्ये झाडांभोवती कुंपण घालणे, त्यांना वेळोवेळी खत देणे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात या लावलेल्या झाडांना पाणी देण्याची जबाबदारी देखील 'बाण'ने घेतली आहे.
4 / 6
याशिवाय अनेक कामे भविष्यात करायची आहेत. यासाठी लोकसहभागाबरोबर आर्थिक पाठबळ देखील गरजेचे आहे.
5 / 6
त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी, पर्यावरणप्रेमींनी त्यांना जमेल तशी मदत करावी, असे आवाहन 'बाण'तर्फे करण्यात आले आहे.