Nitesh Rane: “मी कुराण तीनदा वाचले”… नितेश राणे हलाल प्रमाणपत्राविरोधात मैदानात, आता चांदा ते बांदा…
Nitesh Rane on Halal certification : मंत्री नितेश राणे यांनी हलाल प्रमाणपत्राविरोधात मोठी घोषणा केली आहे. सिंधुदुर्ग येथे त्यांनी हिंदू जनजागृती मोहिमेची औपचारिक सुरुवात केली आहे. काय आहे ही मोहिम?

अनंत पाताडे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : मंत्री नितेश राणे हे हलाल प्रमाणपत्राविरोधात पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. त्यांनी चांदा ते बांदा अशा मोहिमेची घोषणा केली. हलाल प्रमाणपत्राविरोधात ही मोहिम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेचे त्यांनी सिंधुदुर्ग येथे औपचारिक उद्धघाटन केले. काल त्यांनी हलाला प्रमाणपत्र आणि त्याविरोधात हिंदूंनी एकत्र येण्याची भूमिका मांडली. त्यांनी यापूर्वी हलाला प्रमाणपत्राविरोधात मल्हार प्रमाणपत्राची मागणी केली होती.
हलालाचा पैसा जिहादसाठी
हलाल प्रमाणपत्र विरोधी कार्यक्रम चांदा ते बांदा हिंदू जनजागृती मोहिमेचा शुभारंभ त्यांनी केला. मी एका धर्माच्या विरोधात आहे. हलालच्या निमित्ताने होणारा पैसा जिहादसाठी वापरला जातो. त्यामुळे अशा मोहिमा सुरू केल्या आहेत.भारत देशात ९० टक्के हिंदू म्हणून आपल्या देशाला हिंदूराष्ट्र म्हणतात. म्हणून आपल्या भूमिका स्पष्ट पाहिजेत. सर्वधर्म समभाव नाही, भाई चारा नाही. पहिल्यांदाच हिंदू धर्म. विविध जिहाद करताना आपल्या बद्दल विचार करतात का? असा सवाल राणे यांनी विचारला.
चूक करणार्याला सोडणार नाही
आपली भगवद्गीता काय शिकविते सर्वांना समान वागवा. चूक केल्यास सुधारण्याचे समर्थन करते. सनातन हिंदू धर्म म्हणतात, गर्व दे कहो हम हिंदू है. राम मंदिर बनले आणि हिंदूंमुळे राम मंदिरात चोरी झाली आणि आमच्या सनातन धर्माने भूमिका स्पष्ट केली की, चूक करणाऱ्याला सोडणार नाही. शिक्षा झालीच पाहिजे. खरात प्रकरण झाले. आमच्या सनातन धर्माने कोणाला पाठीशी घातले नाही. आमच्या धर्मात गो मातेला देवाचे स्थान दिले असून तुम्ही तिला कापून व्यवसाय करतात. त्यांच्या धर्मात डुक्कर निषेध आहे. आम्ही तुमच्या सारख्या असे केले तर गणपती सणात अंडी मारली. नवरात्रात चप्पल मारली आम्ही तुम्हाला या हिंदू राष्ट्रात राहायला दिले. इस्लामी राष्ट्रात हिंदूंचे काय करतात, असे मत त्यांनी मांडले.
मी कुराण तीनदा वाचले
आज यांच्या धर्मातील प्रत्येक जण बुरखाखाली येऊन सगळ्या योजनांचा फायदा घेतात. यांच्यात १६ प्रकारचे हलाल-हराम आहेत. मी कुराण तीनदा वाचले. सर्व पदार्थांवर ते थुंकतात त्यांच्या धर्मात ते आहे त्यांच्या धर्मात हलाल खावे असे असेल तर आम्ही का खावे? ते तुम्ही खा! हलालचा पैसा या हिंदू राष्ट्राला इस्लामी करण्यासाठी वापरतात २०४७ पर्यंत आपले राष्ट्र इस्लाम बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे “गझवा हिंद” करायचे आहे, असे ते म्हणाले.
ते लोक कडवट होऊ शकतात मग आपण कमी का पडतो. आपण संविधान मानतो. ते शरया कानून मानतात. इस्लाम मध्ये मूर्तीपूजा मान्यता नाही. आमच्या नवरात्रीत का येता? आमच्या आई बहिणीना त्रास का देता? नालासोपारा येथील कालचेच प्रकरण बघा. मुस्लिमाने हिंदू तरूणीचे फोटो काढून व्हायरल केले. माझी मदत कधी लागेल. त्यावेळी मी येईन. समाज म्हणून एकत्र या. कडवट भूमिका घ्या. आमची पदे टेंपररी आहेत. काम करा आणि मला फोन करा. मला हिंदू बांधवांनीच निवडून आणले आहे. हिंदूंनी कडवट व्हावे, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.
