मंत्रिमंडळात किती महिला असाव्यात?, चित्रा वाघ यांनी आकडाच सांगितला; भाजप निर्णय घेणार?

| Updated on: Jan 08, 2023 | 11:53 AM

फक्त तिकीट घेऊन जमत नाही. निवडून आलं पाहिजे. इलेक्ट्रोल मेरीट लागतं. सक्षम असलेल्या महिलेला संधी दिली पाहिजे. पण केवळ महिला आहे म्हणून मला संधी द्या या मताची मी नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मंत्रिमंडळात किती महिला असाव्यात?, चित्रा वाघ यांनी आकडाच सांगितला; भाजप निर्णय घेणार?
मंत्रिमंडळात किती महिला असाव्यात?, चित्रा वाघ यांनी आकडाच सांगितला; भाजप निर्णय घेणार?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सोलापूर: राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गटाचे नेते तर मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीखही सांगताना दिसत आहे. त्यामुळे आपल्याला मंत्रिपद मिळेल याकडे सत्ताधारी आमदार डोळे लावून बसले आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात किमा 3-4 महिलांना संधी दिली पाहिजे, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. त्यामुळे भाजप चित्रा वाघ यांची ही मागमी मान्य करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

चित्रा वाघ या सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. राज्य मंत्रिमंडळात तीन ते चारजणींना संधी द्या. आमच्याकडे कॅलिबर महिला आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात १०० टक्के महिलांना संधी द्या, असं चित्रा वाघ म्हणाल्या. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल हे मला माहीत नाही. हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

आपल्याकडे महिलेलाच महिला बालकल्याण खातं दिलं जातं. पहिल्यांदाच पुरुषाला महिला बाल कल्याण खातं देण्यात आलं आहे. खरं तर ही चांगली गोष्ट आहे. पुरुषांनाही कळू द्या महिलांच्या समस्या काय आहे. या निमित्ताने महिलांच्या समस्या पुरुषांनाही समजेल, असं त्या म्हणाल्या.

यावेळी त्यांनी महिला नेत्यांना कानपिचक्याही दिल्या. फक्त तिकीट घेऊन जमत नाही. निवडून आलं पाहिजे. इलेक्ट्रोल मेरीट लागतं. सक्षम असलेल्या महिलेला संधी दिली पाहिजे. पण केवळ महिला आहे म्हणून मला संधी द्या या मताची मी नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही टीका केली. कुणाच्या परवानगीने मला नोटीस दिली? मला अशा 56 नोटिसा येत असतात. मला पाठवलेली नोटिस जशी जाहीर करण्यात आली, तसं मी पाठवलेलं उत्तरही जाहीर करा, असं आव्हानच त्यांनी दिलं.

यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राऊत मोठ्या गॅपने बाहेर आले आहेत. तुरुंगात मानसिक शारिरीक परिणाम होत असतात. हे दूरगामी परिणाम असतात. त्यामुळे ते बोलत आहेत. त्यांना आरामाची गरज आहे, असा टोला त्यांनी लगावला.