Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…

| Updated on: Jan 09, 2023 | 6:19 AM

सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी, अर्थ, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील घडामोडी याशिवाय राज्यातील वेगवेगळ्या शहरात घडणाऱ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगमधून आढावा घेणार आहोत.

Maharashtra Breaking News Live : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…
Maharashtra Breaking News Live Image Credit source: tv9 marathi

मुंबई: धनुष्यबाण चिन्हं कुणाला द्यायचं यावर येत्या 12 जानेवारीपासून निवडणूक आयोगाकडे सुनावणी. दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीची लाट. महाराष्ट्राचा पाराही 9 जानेवारीनंतर घसरणार. भारताने श्रीलंकेविरोधातील टी-20 मालिका जिंकली. याशिवाय राज्यातील वेगवेगळ्या शहरात घडणाऱ्या घडामोडींचा या लाईव्ह ब्लॉगमधून आढावा घेणार आहोत. सामाजिक, राजकीय, गुन्हेगारी, अर्थ, मनोरंजन, क्रीडा क्षेत्रातील घडामोडीही इथे वाचायला मिळतील.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 08 Jan 2023 08:08 PM (IST)

    सोलापूरमध्ये तरुणांमध्ये फ्री स्टाईल मारहाण

    शहरातील चार हुतात्मा स्मारकाजवळ झाली मारहाण

    एका युवकाला जमावाकडून बेदम मारहाण

    मारहाणी दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत भांडण सोडवले

    शहरातील पार्क चौपाटी भागात मोठी वर्दळ असलेल्या भागात मारहाण

  • 08 Jan 2023 07:34 PM (IST)

    उत्तर भारतात थंडीची तीव्रता वाढली

    उत्तर भारतात थंडीची तीव्रता वाढली

    राजधानी दिल्लीत शाळा बंद राहणार

    15 जानेवारीपर्यंत दिल्लीमधील शाळा बंद

    सरकारी आणि खासगी शाळा बंद करण्याचा निर्णय

    दिल्लीत अनेक ठिकाणी पारा घसरला

    दिल्लीत काही ठिकाणी 2 अंश तापमान

  • 08 Jan 2023 12:56 PM (IST)

    राष्ट्रवादीकडून ठाण्यात जनजागार यात्रेचं आयोजन

    राष्ट्रवादीकडून ठाण्यातील कळवा विटावा खरीगांव परिसरात जनजागार यात्रेचं आयोजन

    राष्ट्रवादी महिला यांच्या माध्यमातून जनजागार यात्रेचं आयोजन

    विद्या चव्हाण जागर यात्रेत सहभागी

    जितेंद्र आव्हाड आणि हृता आव्हाड कार्यक्रमाला उपस्थित

    महागाई, बेरीजगारी आणि महिलांचे प्रश्न मांडत नागरिकांचं प्रबोधन करण्यात येतंय

  • 08 Jan 2023 10:18 AM (IST)

    राज ठाकरे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला

    राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर

    आमदार लक्ष्मण जगताप यांचं काही दिवसांपूर्वी झालं दीर्घ आजाराने निधन

    राज ठाकरेंकडून जगताप कुटुंबीयांचं सांत्वन

  • 08 Jan 2023 08:35 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात टिळक कुटुंबियांची घेणार सांत्वनपर भेट

    आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झालं होतं

    आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी टिळक कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केलं

    राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत, आज ते टिळक कुटुंबियांची भेट घेताहेत

  • 08 Jan 2023 08:07 AM (IST)

    राष्ट्रवादीकडून सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान

    पुण्यात राष्ट्रवादीकडून सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान

    सिंहगड स्वच्छता अभियानाला खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती

    'आपला सिंहगड आपला अभिमान' म्हणत राष्ट्रवादीकडून सिंहगड किल्ल्याची स्वच्छता मोहीम

    सुप्रिया सुळे स्वतः किल्ल्यावर स्वच्छता करणार

  • 08 Jan 2023 07:56 AM (IST)

    आजपासून अमरावती जिल्ह्याचे तापमान कमी होणार, थंडीत होणार पुन्हा वाढ

    जिल्हा कृषी हवामान तज्ज्ञांचा सतर्कतेचा इशारा

    जिल्ह्याचे किमान तापमान 9 सेल्सिअस अंशापेक्षा खाली येण्याची शक्यता

    7 ते 11 जानेवारीपर्यत वातावरण कोरडे आणि आकाश निरभ्र राहण्याची शक्यता

  • 08 Jan 2023 06:13 AM (IST)

    श्रीराम सेनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्यावर गोळीबार

    बेळगाव जवळच्या हिंडलगा परिसरात कारमधून जात असताना दोघा अज्ञातांकडून गोळीबार

    सायंकाळच्या सुमाराची घटना

    रवी कोकितकर यांच्या मानेवर लागली गोळी

    कोकितकर यांच्यावर केएलई रुग्णालयात उपचार सुरू

    गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ

  • 08 Jan 2023 06:12 AM (IST)

    मिरजेतील दुकाने आणि हॉटेल पाडल्याच्या निषेधार्थ आज मिरज शहर बंद

    सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत बंदचा झाला निर्णय

    आज उत्स्फूर्तपणे मिरज शहर बंद ठेवण्यात येणार आहे

    अन्य कोणतेही आंदोलन करण्यात येणार नाही

    तसेच पीडित दुकानदार आणि हॉटेल मालकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय आणि सर्व संघटना पाठीशी राहणार

  • 08 Jan 2023 06:10 AM (IST)

    मुंबईच्या अब्दुल रहमान स्ट्रीट परिसरातील आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश

    आग विझली असून कुलिंग ऑपरेशनही करण्यात आलं

    या आगीत कुठलीही जीवित हानी झालेली नाही, मात्र दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे

    शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज

  • 08 Jan 2023 06:07 AM (IST)

    धुळे शहरात टँकर चालकाने अनेक वाहनांना उडवले

    अपघात काही वाहन चालक जखमी

    मद्यपी टँकर चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

    शहरातील संतोषी माता चौक ते फाशीदपूर दरम्यान घडली घटना

    गुजरातकडे जात होता टँकर त्यादरम्यान अनेक वाहनांना दिली धडक

    नेमके किती लोक जखमी झाले आहेत? याचा पोलिसांकडून शोध

    वाहन चालकाचे नाव राजेंद्र सिंग सकट असल्याची माहिती

Published On - Jan 08,2023 6:01 AM

Follow us
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.