AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Trending Baby Song Release : कारच्या स्टेअरिंगवर सुचलेलं, एका सेकंदात मनाला भिडणारं, ओठांवर बसणारं उमेश कुमावत यांचं ‘ट्रेंडिंग बेबी’ आलं VIDEO

Trending Baby Song Release : एखाद्या गाण्याचा जन्म कुठे होईल, कसा होईल आणि ते गाण कसं हिट होईल हे कोणीही सांगू शकत नाही. बॉलिवूडमध्ये अशी अनेक गाणी आपण पाहिली आहेत, ज्यांचा जन्म कोणी कल्पना केली नव्हती अशा ठिकाणी झाला आणि ती गाणी हिट झाली. असचं एक 'ट्रेंडिंग बेबी'साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Trending Baby Song Release : कारच्या स्टेअरिंगवर सुचलेलं, एका सेकंदात मनाला भिडणारं, ओठांवर बसणारं उमेश कुमावत यांचं 'ट्रेंडिंग बेबी' आलं VIDEO
Trending Baby Song Release
| Updated on: Nov 11, 2026 | 3:00 PM
Share

संगीत आणि लेखन ही अशी दोन क्षेत्र आहेत, जिथे ठरवून एखादी चांगली कलाकृती जन्माला येत नाही. गाणं असो वा एखादा लेख तुम्ही ठरवून लिहायला बसलात तर चांगले शब्द, चांगल्या ओळी त्यावेळी सुचतीलच असं नाही. गाण्याच्या ओळी किंवा एखादा चांगला लेख रस्त्यात चालता, चालताही आकाराला येतो. त्याची अनेक उदाहरणं आपल्या आसपास पहायला मिळतील. अनेकदा आपण गंमतीने एखाद्याला बाथरुम सिंगर म्हणून चिडवतो. पण कदाचित त्याच्या गाण्याचे सूर तिथे चांगले लागत असतील, त्यावेळी एखादं चांगलं गाणं तिथे सुचत असेल. जगातल्या अनेक चांगल्या गाण्यांचा जन्म हा मोठ्या स्टुडिओमध्ये नाही, तर बेडरुममध्ये किंवा अशा एखाद्या प्रसंगात झालाय, ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. स्वत: जावेद अख्तर यांनी याचं एक उदहारण दिलय.

1982 साली ‘साथ साथ’ चित्रपट आला. या चित्रपटात फारुख शेख आणि दीप्ति नवल यांच्यावर एक गजल चित्रित झालय. ‘तुमको देखा तो ये खयाल आया’ ही गजल जावेद अख्तर यांच्या लेखणीतून उतरलीय. आज या गजलला 44 वर्ष झाली. पण तरी सुद्धा ती तितकीच हिट आहे. ही गजल ऐकल्यानंतर आजही मनाला एक वेगळी शांतता मिळते, एक सुखद अनुभव असतो. जावेद अख्तर या गजलचा किस्सा सांगताना म्हणाले की, “एक दिवस मी 8 ते 9 पेग रिचवले होते. रात्रीचे दोन वाजलेले, त्यावेळी कागद आणि पेन घेतलं आणि 9 मिनिटात हे गाण उतरवलं. जगजीत सिंह यांच्या आवाजातील हे गाण आजही प्रेक्षकांना भावतं, जवळच वाटतं”

तु मेरा क्रश है, तू मेरा रब है

TV9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांच्या लेखणीतून अवतरलेल्या ‘o baby u r trending in my heart’ या गीताचा जन्म सुद्धा असाच वेगळ्या पद्धतीने झालाय. हे गीत ठरवून लिहिलेलं नाही. गाडी चालवताना स्टेअरिंग हातात असताना हे गाण सुचलं. कॉलेजच्या वयात मुलं प्रेमात पडतात. एखादी मुलगी नजरेत बसते, आवडते. ती मुलगीच आपलं आयुष्य आहे, असं त्या वयात वाटू लागतं. त्या ज्या भावना आहेत, त्या या गाण्याच्या माध्यमातून अत्यंत अचूकतेने मांडल्या आहेत. ‘तेरी जैसी कोई नही, तेरी जैसी देखी नहीं, जब से मुझे होश है , तु मेरा क्रश है, तू मेरा रब है, तू मेरा सब है, तू मेरा रास्ता, तू सफर है..’ या गाण्यांच्या ओळींमधून ती मुलगीच त्या मुलाचं जग आहे हे दिसून येतं. जवळपास नऊ वर्षांपूर्वी हे गाण सुचलेलं. त्यावेळी ‘जेन झी’ हा शब्दही कोणाच्या गावी नव्हता. पण आजच्या जने झी पिढीला हे गाणं एकदम चपलख बसतं.

विविध प्लॅटफॉर्म्सवर गाणं ऐकू शकता-

युट्यूबवर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

Apple Music वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

Spotify वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

Amazon Music वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

Gaana वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

Follow Us
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान
काल गोकुळची निवडणूक पार पडलीच नाही, ती... बड्या नेत्याचा दाव्याने खळबळ
Gokul Milk Union : काल गोकुळची निवडणूक पार पडलीच नाही, ती... बड्या नेत्याचा दाव्याने खळबळ
चंद्रकांत पाटलांचं गोकुळ निवडणुकीबाबत 'ते' वक्तव्य, अन् राऊत म्हणाले..
Sanjay Raut vs Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचं गोकुळ निवडणुकीबाबत 'ते' वक्तव्य, अन् राऊत म्हणाले...