दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच बीडमधून मोठी बातमी, दोन्ही गटाचे बडे नेते एकत्र, थेट…, नेमकं काय घडंतय?
गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय वर्तुळात ज्या पद्धतीने घडामोडींना वेग आला आहे, त्यावरून पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यातच आता बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे रुग्णालयात असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेले यांनी शरद पवार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला सुरुवात झाली. त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकेर यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला होता. आता सध्या विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नाही, मात्र अजित पवार असते तर बारा फेब्रुवारी रोजीच विलिनीकरण झालं असतं, असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केला आहे.
दरम्यान मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या फार उत्सुक नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. एकीकडे गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठकांवर बैठका सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटातील महत्त्वाच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर पार्थ पवार यांनी देखील शरद पवार यांची दोनदा भेट घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या गटाचं विलिनीकरण होणार का? अशी चर्चा सुरू आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच आता दुसरीकडे बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी एकत्र आले आहेत. गाळपेरा करताना खासदार बजरंग सोनवणेंनी पेरणी केली तर, आमदार विजयसिंह पंडितांनी यावेळी कासरा धरला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित एकत्र दिसून आले. यावेळी ते फक्त एकत्रच आले नाहीत, तर कार्यक्रमस्थळी त्यांनी एकमेकांची विचारपूस देखील केली, यावेळी दोघांमध्ये गप्पा देखील रंगल्याचं पहायला मिळालं. दुष्काळी उपाययोजनांसंदर्भात राबवलेल्या गाळपेरा कार्यक्रमादरम्यान बीड तालुक्यातील मनकर्णिका धरणावर हे दोन्ही नेते, एकत्र आल्याचं पहायला मिळालं.
