जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे CRPF टीमवर अतिरेकी हल्ला, तीन जवान जखमी, परिसराची घेराबंदी…
जम्मू-कश्मीरच्या सीआरपीएफ बटालियनवर कुलगाम येथे अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. सीआरपीएफच्या पेट्रोलिंग टीमवर मोटारसायकलवरुन आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने तीन जवान जखमी झाले आहेत.

जम्मू-कश्मीरच्या सीआरपीएफ बटालियनवर कुलगाम येथे अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. सीआरपीएफच्या पेट्रोलिंग टीमवर मोटारसायकलवरुन आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि ते घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाल्याचे समजते. सीआरपीएफने या ठिकाणी काऊंटर फायरिंग सुरु केली आहे.
जम्मू-काश्मीर येथील शांतता पुन्हा भंग झाली आहे. कुलगाम जिल्ह्यात सीआरपीएफच्या एका बटालियनवर मोटारसायकलवरुन आलेल्या अतिरेक्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर तेथे आणखी घेराबंदी करीत बॅरिकेट्डचे लावण्यात आले आहे. संपूर्ण भागाची घेराबंदी केली असून अतिरेक्यांचा शोध घेतला जात आहे. स्थानिक लोकांना आपल्या घरातून बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सीआरपीएफचे निवेदन
जम्मू -काश्मीर कुलगाम येथे अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या बटालियनवर गोळीबार केल्यानंतर या घटनास्थळी सायरन वाजवत एम्ब्युलन्स आणि चिलखती वाहनात सुरक्षादलाचा ताफा पोहचला.जखमी झालेल्या जवानांवर उपचार सुरु आहेत. अतिरेकी घटनेनंतर सीआरपीएफने देखील आपण निवेदन जारी केले आहे. सीआरएफने सांगितले की आज दुपारी जम्म-कश्मीरच्या कुलगाम जिल्ह्याततील एका नाक्यावर तैनात सुरक्षा दलाच्या जवानांवर मोटारसायकलीवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला आणि ते पळून गेले.
ही घटना दुपारी २.१५ वाजता घडली आहे. हल्लेखोरांनी सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार केला आणि त्यानंतर ते झालेल्या गोंधळाचा फायदा उठवून पसार झाले आहेत. जखमी झालेल्या जवानांना अनंतनाग जिल्ह्यातील एका रुग्णालयात नेण्यात आले आहे. एका जवानाचा पायात गोळी लागली आणि एका जवानाच्या खांद्याजवळ गोळी लागल्याचे माहिती उघड झाली आहे.
काऊंटर ऑपरेशन सुरु
CRPF जवानांनी देखील अतिरेक्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसरात काऊंटर ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. क्विक रिएक्शन टीम घटना स्थळी रवाना झाल्या आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराबंदी करीत हल्लेखोरांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. दक्षता म्हणून संपूर्ण भागाची सुरक्षा वाढवण्यात आले आहे.
